मुंबई: गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात छोट्या पडद्याची घडी विस्कटली होती. मालिकांचं चित्रीकरण बंद होतं. त्यामुळं प्रसारित करण्यासाठी मालिकांचे नवे भाग वाहिन्यांकडे नव्हते. परिणामी चित्रपट आणि जुन्या लोकप्रिय मालिकांचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. पण त्याच मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. वाचा: टीव्ही मालिका टीआरीपीच्या स्पर्धेत टिकत नसल्यानं निर्माते मालिका बंद करण्याचा निर्णय घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी मालिका तडकाफडकी बंद करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. याच यादीत आता आणखी दोन मालिकांची भर पडण्याची शक्यता आहे. सध्या चर्चेत असलेली मालिका देखील लवकरच निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर ही मालिका देखील आता शेवटच्या टप्प्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळं मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. चार महिन्यांपूर्वी सुरू झालेलं 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेचं नवं पर्व '' या मालिकेच्या रुपात बघायला मिळालं. पहिल्या पर्वात सासूच्या पाठीशी सून आणि आता दुसऱ्या पर्वात सूनेच्या पाठीशी सासू असं चित्र दिसून आलं. पण मालिकेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मालिका संपवण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचं कळतं. या महिन्याच्या अखेरीस मालिकेचं चित्रीकरण पूर्ण होईल. तर ऑगस्टमध्ये मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचं समजतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3BgFvFZ