मुंबई: टीव्ही असो किंवा बॉलिवूड अभिनेत्री. कास्टिंग काऊचचा अनुभव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना आला आहे. अनेक अभिनेत्रींनी यावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे. ज्यात आता 'तारक मेहता' फेम टीव्ही अभिनेत्री आराधना शर्माचाही समावेश झाला आहे. आराधनानं तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील अनुभव शेअर केला आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात स्क्रिप्ट वाचत असताना एका कास्टिंग डायरेक्टरनं तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे तिच्या मनावर गंभीर परिणाम झाला होता. आपल्या कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल ई-टाइम्सशी बोलताना आराधना म्हणाली, 'एक घटना माझ्यासोबत ४-५ वर्षांपूर्वी घडली होती. जी विसरणं माझ्यासाठी कठीण आहे. त्यावेळी मी पुण्यात शिकत होते आणि ही घटना माझ्यासोबत रांचीमध्ये घडली होती. मुंबईतील एका कास्टिंग डायरेक्टर माझ्यासोबत गैरवर्तन केलं होतं. त्यावेळी मी पुण्यात मॉडेलिंग करत होते आणि थोडी फार प्रसिद्धीही मिळाली होती.' आराधना पुढे म्हणाली, 'मी रांचीला गेले कारण त्यानं मला सांगितलं होतं की, तो एका भूमिकेसाठी कास्टिंग करत आहे. आम्ही एका रुममध्ये स्क्रिप्ट वाचत होतो आणि त्यानं माझ्याशी गैरवर्तन केलं होतं. त्यानं मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. काय होतंय हे मला समजतही नव्हतं. मी त्याला धक्का दिला आणि दरवाजा खोलून तिथून पळून गेले. अनेक दिवस मी गोष्ट कोणाशीच शेअर केली नव्हती. त्या स्क्रिप्टमध्ये एक लव्ह सीन होता. हे खूपच वाईट होतं.' आराधना सांगते, 'या घटनेचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला की, मला कोणावरही विश्वास ठेवणं कठीण जात होतं. मी कोणत्याही पुरुषासोबत एका रुममध्ये काही वेळासाठीही थांबू शकत नव्हते. एवढंच नाही मला माझ्या वडिलांसोबतही थांबायची भीती वाटत असे. त्यावेळी १९-२० वर्षांची होते. मी कोणलाच स्वतःला स्पर्श करू देत नव्हते. मला खूप वाईट वाटत होतं. माझी आई आणि मी त्याला भेटायला जाणार होतो पण माझ्या कुटुंबीयांनी असं न करण्याविषयी सुचवलं.' 'स्प्लिट्सविला'मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली आराधना काही दिवसांपूर्वीच ''मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली होती. त्याआधी ती 'अलादीन- नाम तो सुना ही होगा' या शोमध्ये दिसली होती. ज्यात तिनं सुल्तानाची भूमिका साकारली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36JhA4a