नवी दिल्लीः करोना काळात कॉन्टॅक्टलेस पेमेंटला प्रोत्साहन मिळत आहे. लोक आता कॅशच्या जागी यूपीआय किंवा वॉलेट वरून किंवा अकाउंटवरून पेमेंट करणे पसंत करीत आहेत. परंतु, चुकून जर घाईघाईत पैसे दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये जातात. त्यानंतर आपण विचार करतो की, आता हे पैसे परत मिळणार की नाही. पण, जर असे चुकून पैसे दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले तर ते पैसे परत मिळवता येऊ शकते. यासाठी एक प्रोसेस आहे. जाणून घ्या या संपूर्ण प्रोसेसबद्दल. वाचाः >> चुकून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यास सर्वात आधी हे काम करा >> जर चुकून तुमच्या हातातून दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यास सर्वात आधी आपल्या बँकेत जाऊन कोणत्या अकाउंट मध्ये पैसे गेले आहे. याची माहिती करून घ्या. >> आता ज्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये चुकून पैसे गेले आहेत. त्यांच्या बँकेशी संपर्क करा. >> चुकून पैसे ट्रान्सफर झाल्याचे त्यांना व्यवस्थित समजून सांगा. त्यानंतर तुम्हाला ते पैसे परत मिळू शकते. >> रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, तुमच्या परवानगी विना जर पैसे काढले जात असेल तर ते तुम्हाला तीन दिवसांच्या आत बँक हे पैसे परत मिळवून देऊ शकते. >> अशा प्रकारे तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता. बँक आपल्या अकाउंटमधून तुमचे पैसे तुम्हाला परत पाठवू देईल. वाचाः अशा घटनेत झाली वाढ गेल्या काही दिवसांपासून अशा घटनेत वाढ झाल्याचे दिसले आहे. अनेक लोकांचा पैसा चुकून दुसऱ्या अकाउंट मध्ये गेलेला आहे. याशिवाय, लोकांना ऑनलाइन फ्रॉडचा सामना सुद्धा करावा लागत आहे. अनेक लोकांना बँकेचे कर्मचाऱ्या असल्याचे सांगून कॉल्स केले जात आहे. करोना काळात अशा घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस आल्या आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hfQcRe