Full Width(True/False)

आता चक्क भाड्याने मिळणार स्मार्टफोन, ‘एवढ्या’ किंमतीत घेऊन जा घरी

नवी दिल्ली : भारतीय बाजारात एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन्स लाँच आहेत. या फोन्सच्या किंमती अधिक असल्याने लोक खरेदी करणे टाळतात. मात्र, आता तुम्ही रेंट म्हणजेच भाड्याने देखील घेऊ शकतात. वारंवार नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी खूप खर्च येतो. अशावेळी भाड्याने फोन घेणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला फ्लॅगशिप फोन देखील मिळतील. या फोन्ससाठी महिन्याचे भाडे ३६९ रुपयांपासून ते ३ हजार रुपयांपर्यंत जाते. वाचाः कोठे मिळेल भाड्याने स्मार्टफोन अनेक अशा वेबसाइट्स आहेत, ज्या भाड्याने स्मार्टफोन पुरवतात. यात , आणि चा समावेश आहे. तुम्ही नवीन अथवा तुमच्या आवडीचा स्मार्टफोन येथून घेऊ शकतात. स्मार्टफोन ६ महिन्यांपासून ते १२ महिन्यांपर्यंत भाड्यावर मिळतील. सोबतच ७ दिवसांचे मोफत ट्रायल देखील मिळेल. यातील flexitrent एका व्यक्तीला फोन भाड्याने देत नाही. तसेच, फोनच्या मासिक शुल्काची देखील माहिती दिलेली नाही. Paytmmall वर फोन्सचे भाडे: Paytmmall वर केवळ तीन फोन्स रेंटवर उपलब्ध आहेत. च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटचे भाडे ३,९४९ रुपये प्रति महिना आहे. Oneplus 7T च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटचे भाडे ३,७९९ रुपये प्रति महिना आहे. तर Oneplus 7 च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी भाजे २,६४९ रुपये प्रति महिना आहे. वाचाः rentomojo वर फोन्सचे भाडे: Oneplus 7 Pro साठी १,९४९ रुपये, Galaxy S10s चे १,६३९ रुपये, Google Pixel 2 साठी १,५४९ रुपये, Apple XS Max साठी ३,३९९ रुपये, आयफोन एक्ससाठी २,८६९ रुपये, iPhone 8 साठी २,०२९ रुपये, Galaxy Note 8 साठी १,५८९ रुपये, Samsung Galaxy A7 साठी ६४९ रुपये, Redmi Note 6 Pro साठी, ३६९ रुपये, OnePlus 7 Pro साठी १,५१९ रुपये आणि Redmi K20 Pro साठी महिन्याला ८४९ रुपये मोजावे लागतील. वरील सर्व फोन्ससाठी शुल्क हे प्रति महिन्याचे आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36EaI8i