जरी महागड्या फोनवर स्मार्टफोन मार्केटचे वर्चस्व असले तरी बहुतेक विक्री ही केवळ बजेट विभागातच होते. मोबाइल डेटाच्या उपलब्धतेमुळे बजेट विभागात फोनची विक्री नक्कीच वाढली आहे. अगदी परवडणार्या स्मार्टफोनमध्येही, तुम्हाला महाग फोनमध्ये मिळणारी जवळ- जवळ सर्वच वैशिष्ट्ये मिळतात. यामध्ये हाय रिझोल्यूशन स्क्रीन, चांगला कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर आणि ४ जी कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे. तुम्हीही बजेट फोन खरेदी करायच्या विचारात असाल तर सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला काही परवडणाऱ्या स्मार्टफोनविषयी सांगत आहो. ज्यांची किंमत १० हजार रुपयांच्या आत आहे. या यादीमध्ये रियलमीसह अनेक स्मार्टफोन समाविष्ट आहेत, जे काही काळापूर्वी लाँच करण्यात आले आहे. ही बजेट स्मार्टफोनची लिस्ट नक्की पाहा आणि ठरवा तुम्हाला कोणता खरेदी करायचा आहे ते. पाहा डिटेल्स.

Micromax in 1B
मायक्रोमॅक्समध्ये १ बी मध्ये ६.५२ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन २ जीबी रॅम, ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि मीडियाटेक हेलियो जी ३५ प्रोसेसरसह येतो. कॅमेर्याबद्दल सांगायचे तर, मायक्रोमॅक्स इन १ बी मध्ये मागील बाजूस १३ मेगापिक्सलचे २ सेन्सर आहेत. फोनच्या पुढील बाजूस ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनची बॅटरी क्षमता ५, ००० mAh असून मायक्रोमॅक्स १ बीची किंमत ६,९९९ रुपये आहे.
Infinix Smart 5
Infinix Smart 5 मध्ये ६.८२ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रिझोल्युशन १६४० x ७२० पिक्सेलआहे. यामध्ये २.० रॅम आणि ३२ जबी इंटर्नल स्टोरेज आहे. हे स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने २५६ GB पर्यंत वाढविले जाऊ जाऊ शकते. Infinix Smart 5 मध्येAndroid v10 (Q) ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. शिवाय ६,००० mAh क्षमतेची बॅटरी आहे. आणि ही बॅटरी Li-ion Polymer या प्रकारची आहे. या फोनचा कॅमेराही जबरदस्त आहे. फोनची किंमत ७,१९९ रुपये आहे.
Poco C3
Poco C3 हा एक परवडणारा फोन आहे. फोनमध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन ७२०x १६०० पिक्सल आहे. फोनमध्ये मीडियाटेक हेलीओ जी ३५ प्रोसेसर देण्यात आले आहे. फोनमध्ये आपल्याला ३ जीबी रॅमसह ३२ जीबी स्टोरेज मिळत आहे. या फोनमध्ये ५,००० mAh ची मजबूत बॅटरी देखील मिळत आहे. सामान्य वापरामध्ये फोन दिवसापेक्षा जास्त बॅटरी देतो . या फोनमध्ये आपल्याला १३ मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा मिळत आहे. फोनची किंमत ७,४९९ रुपये आहे.
Realme Narzo 30 A
Realme Narzo 30A ची किंमत ८,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी ८५ प्रोसेसर आणि ६,००० एमएएच बॅटरी आहे, जी १८ डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, ज्यामध्ये १३ एमपी प्रायमरी सेन्सर आणि मोनोक्रोम लेन्स आहेत. याशिवाय फोनच्या पुढील बाजूस ८ एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये सुपर नाईट मोड, क्रोम बूस्ट, पोर्ट्रेट मोड देखील देण्यात आला आहे.
Realme C25
रियलमी सी 25
रियलमी सी 25 Android ११ ओएस सह रिअलमी यूआय २.० वर काम करते. यात ६.५ इंचचा एचडी + डिस्प्ले आहे ज्याचे स्क्रीन रेजोल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ जी ७० प्रोसेसरसह सुसज्ज आहे. हे दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले असून वापरकर्त्यांना दोन्ही रूपांमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळेल. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये १८,००० फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएच बॅटरी आहे. फोनची किंमत ८,९९९ रुपये आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i9jDDX