नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला हा उद्या (६ जुले) भारतात लाँच होणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने फ्लिपकार्टद्वारे फोनबाबत माहिती दिली होती. भारतात हा स्मार्टफोन ९० हर्ट्ज एचडी+ डिस्प्ले आणि ४८ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप सारख्या फीचर्ससोबत येईल. या फोनबाबत सविस्तर जाणून घेऊया. वाचा: कंपनीच्या F सीरिजमध्ये या वर्षी लाँच होणारा चौथा स्मार्टफोन आहे. याआधी कंपनीने Galaxy F02s, Galaxy F12 आणि Galaxy F62 ला देखील लाँच केले आहे. लाँचच्या आधी गॅलेक्सी एफ२२ ला फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आले आहे. येथे फोनचे डिझाइन पाहता येईल. सोबतच, कंपनीने देखील काही स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. Galaxy F22 स्मार्टफोन ६.४ इंच HD+ sAMOLED डिस्प्लेसोबत येईल. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज असेल. स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासोबत क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. याशिवाय यात पॉवरसाठी ६०००एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. वाचा: रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनला गुगल प्ले कंसोल वेबसाइटवर देखील स्पॉट करण्यात आले होते. येथून मिळालेल्या माहितीनुसार, फोन अँड्राइड ११ वर काम करेल व यात ४ जीबी रॅमसह MediaTek Helio G८० प्रोसेसर मिळेल. दरम्यान, सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच भारतात Galaxy A22 ला देखील लाँच केले आहे. या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,४९९ रुपये आहे. फोन ब्लॅक आणि मिंट रंगात येतो. यात ९०Hz AMOLED डिस्प्ले, ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि ४८MP क्वाड कॅमेरा सेटअप सारखे फीचर्स मिळतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yBMJ5F