मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचे दुसरे लग्नही मोडले आहे. मीडिया रिपोर्टनुसार पत्नी आणि आमिर यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. २८ डिसेंबर २००५ रोजी या दोघांचे लग्न झाले. आमिर आणि किरण दोघांनी घटस्फोटाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत या संबंधीची माहिती दिली. असं असलं तरी मात्र, आझादचे पालनपोषण एकत्रितपणे करण्याचा तसेच व्यावसायिक पातळीवरही एकत्र काम करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला आहे. अशी झाली होती किरण-आमिरची भेट आमिर आणि किरण यांची पहिली भेट २००० मध्ये 'लगान' सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी आमिरचे लग्न झाले होते. लगान सिनेमासाठी किरण सामिन देसाई यांना सहाय्य करत होती. किरणला पाहिल्यावर आमिरला ती आवडली होती. त्यानंतर सातत्याने या दोघांच्या भेटी होत गेल्या आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. १० हजार रुपयांवर काम करायची किरण रिना दत्ताशी घटस्फोट झाल्यानंतर २००५ मध्ये आमिरने किरणशी लग्न केले. रिना 'लगान' सिनेमात काम करत होती तेव्हा तिचा पगार १० हजार रुपये होता. लगान नंतर किरणने डेली बेली, धोबी घाट, पीपली लाइव यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. किरण ही अतिशय स्पष्टवक्ती म्हणून ओळखली जाते. ज्या गोष्टी तिला पटतात, रुचतात त्या करायला ती मागे पुढे पाहत नाही. घरच्यांच्या विरोधात जाऊन आमिरने केले होते पहिले लग्न आणि रीन दत्ता यांनी लव मॅरेज केले होते. यांच्या लग्नाला दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता. परंतु आमिर आणि रिना एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी घरच्यांचा विरोध पत्करून १८ एप्रिल १९८६ मध्ये लग्न केले. या दोघांनी लग्न केले तेव्हा आमिर २१ वर्षांचा तर रिना १९ वर्षांची होती. आमिरने रिनाशी लग्न केल्यानंतर त्याचा कयामत से कयामत तक हा सिनेमा रिलीज झाला आणि तो रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर गेला. रिना आणि आमिरला आयरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत. आमिरच्या आयुष्यात किरण आल्यानंतर रिना आणि आमिरचा १६ वर्षांचा संसार मोडला. किरणशी लग्न करण्यासाठी इतकी दिली पोटगी आमिर जेव्हा किरणला भेटला तेव्हा त्याचे रिना दत्ताशी लग्न झालेले होते. परंतु आमिर किरणच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. त्यामुळे रिनाला त्याने घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. रिनाला पोटगीसाठी त्याने ५० कोटी रुपये देण्याचे त्याने मान्य केले आणि त्यानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळचा तो सर्वात महागडा घटस्फोट होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2SMUoyE