नवी दिल्ली : ने आपली नवीन स्मार्चवॉच ColorFit Qube ला भारतात लाँच केले आहे. भारतात या वॉचची विक्री पुढील आठवड्यापासून सुरू होईल. याची किंमत ३ हजार रुपयांच्या आत आहे. यामध्ये हार्ट रेट सेंसर, टच स्क्रीन डिस्प्ले, एक आठवड्यांची बॅटरी लाइफ आणि अनेक स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत. वाचा : ची भारतात किंमत २,४९९ रुपये आहे. याची विक्री ६ जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या कंपनीच्या साइटवर वॉच ४,९९९ रुपयांसह लिस्ट करण्यात आली आहे. मात्र, फ्लिपकार्टवर उपलब्ध झाल्यानंतर कमी किंमत असण्याची शक्यता आहे. Noise ColorFit Qube चे फीचर्स Noise ColorFit Qube मध्ये २४०x२४० पिक्सल रेझॉल्यूशनसह १.४ इंच स्क्वेअर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कर्व्ड आहे आणि टीएफटी पॅनेलचा वापर करण्यात आला आहे. वॉचमध्ये क्लाउड बेस्ड वॉच फेसचा सपोर्ट देखील मिळेल. म्हणजेच, यूजर्स अॅपद्वारे वॉच फेस बदलू शकतील. यात बाजुला एक बटन देण्यात आले आहे. कनेक्टिव्हीसाठी या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ ५.१ सपोर्ट मिळेल. ही वॉच अँड्राइड आणि आयओएस दोन्हीसोबत कंपॅटिबल आहे. वॉचचे वजन केवळ ३२ ग्रॅम आहे. वॉचमध्ये चारकोल ब्लॅक, चारकोल ग्रे आणि बेझ गोल्ड कलर पर्याय मिळेल. वाचा : Noise ColorFit Qube मध्ये २४/७ हार्ट रेट मॉनिटर देण्यात आले आहे. मात्र, यात ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी SpO2 सेंसर नाही. या व्यतिरिक्त वॉचमध्ये स्टेप्स काउंट, कॅलरी बर्न, स्लीप ट्रॅकिंग आणि डिस्टेंस ट्रॅकिंग सारखे फीचर्स मिळतील. या वॉचमध्ये अनेक स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहे. सोबतच, नॉटिफिकेशन अलर्ट्स, कॅमेरा कंट्रोल, वेदर इंफो, स्टॉपवॉच, फाइंड माय फोन, अलार्म, टाइमर सारखे फीचर्स मिळतील. कंपनीचा दावा आहे की फोनची बॅटरी ७ दिवस टिकेल. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ylT9FU