Full Width(True/False)

अधुरी प्रेम कहाणी! वडिलांमुळे तुटलं मधुबाला- दिलीप कुमार यांचं प्रेम

मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता यांचे बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास हिंदूजा इस्पितळात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांचे सिनेकरिअर किती यशस्वी होते हे काही वेगळं सांगायची गरज नाही. व्यक्तिगत आयुष्यातही त्यांना सायरा बानो यांच्या रुपाने भक्कम जीवनसाथी मिळाला होता. अर्थात सायरा बानो या दिलीप यांच्या आयुष्यात येणाऱ्या पहिल्या नव्हत्या. त्या आधी दिलीपजींच्या आयुष्यात होत्या. दिलीप कुमार आणि मधुबाला नऊ वर्ष नात्यात होते. ऑनस्क्रीन प्रमाणेच या दोघांची ऑफस्क्रीन जोडीही लोकांना भावली होती. त्या दोघांमध्येही खूप छान बाँडिंग होते आणि ते सर्वश्रुत होते. मधुबाला यांची बहिण मधुर ब्रिज भूषण यांनी दिलीप आणि मधुबाला यांच्या नात्याबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यांनी सांगितले की, ' दिलीप कुमार आणि मधुबाला यांची पहिली भेट 'तराना' सिनेमाच्या सेटवर झाली होती. ही दोघं नऊ वर्ष नात्यात होती. या दोघांनी एकमेकांशी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या इतकेच नाही तर त्यांचा साखरपुडाही झाला होता. दिलीप कुमार मधुबालाला भेटायला यायचे. त्यानंतर ते दोघेजण गाडीतून फिरायला जायचे. दिलीप कुमार यांना लहान मुले खूप आवडायची. त्यांच्यात ते खूप रमायचे. मधुबाला आणि दिलीप यांच्यातील नाते खूप सुंदर होते. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते.' मधुबाला आणि दिलीप यांच्या ब्रेकअपबद्दल मधुर यांनी सांगितले की, 'नया दौर सिनेमाच्या चित्रीकरणावेळी सुरू असलेल्या कोर्टातील केसमुळे या दोघांमधील नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. सिनेमाच्या चित्रीकरणावेळी मधुबाला यांची कुणी तरी छेड काढली होती. त्यामुळे मधुबाला यांच्या वडिलांना आपल्या मुलीची काळजी वाटू लागली. त्यांनी अभिनेत्रीला तिथे न जाण्यास सांगितले. चित्रीकरणाची जागा बदला तरच मधुबाला येईल असेही त्यांच्या वडिलांनी निर्मात्यांना सांगितले होते. ही गोष्ट दिलीप कुमार यांना अजिबात आवडली नाही. रागाच्या भरात दिलीप कुमार यांनी मधुबाला यांच्या वडिलांना हुकूमशहा असे म्हटले. यावरून मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या नात्यामध्ये दुरावा यायला सुरुवात झाली. ' मधुर यांनी पुढे सांगितले की, 'या सर्व घटनांमुळे मधुबाला खूपच दुःखी झाल्या होत्या. याच काळात वडिलांना सोडून ये आपण दोघे लग्न करू असा प्रस्ताव दिलीप कुमार यांनी त्यांच्यापुढे ठेवला होता. परंतु मधुबाला यांनी त्याला सपशेल नकार दिला आणि घरी येऊन आपल्या वडिलांची माफी मागावी असे दिलीप कुमार यांना सांगितले. मात्र, यांच्या घरी गेले नाही. दोघेहीजण आपापल्या मतांवर ठाम होते. त्यावरून या दोघांचे नातेसंबंध दुरावले आणि नऊ वर्ष सुरू असलेलं प्रेम संपुष्टात आलं.' मधुबाला आणि दिलीप कुमार यांनी चार सिनेमांमध्ये काम केले होते. त्यामध्ये रताना, संगदिल, अमर आणि मुगल-ए-आजम यांसारख्या सिनेमांचा समावेश होता. भले या दोघांची प्रेमकहाणी यशस्वी झाली नाही तरी या दोघांची जोडीने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hLaMIg