Full Width(True/False)

दिशा परमारच्या मंगळसूत्राने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, काय आहे खास

मुंबई- 'बिग बॉस १४' चा स्पर्धक आणि लोकप्रिय अभिनेत्री नुकतेच विवाहबंधनात अडकले. १६ जुलै रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वी राहुल आणि दिशाने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. दिशा आणि राहुलच्या लग्न समारंभातील फोटोंनी सोशल मीडियावर जणू धुमाकूळ घातला होता. वधू- वराच्या कपड्यांचं देखील नेटकऱ्यांकडून कौतुक करण्यात आलं. आता दिशाच्या अनोख्या मंगळसूत्राने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मंगळसूत्राचं साधं डिझाइन नेटकऱ्यांना भावलं आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर दिशा आणि राहुल यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आहेत. नेटकऱ्यांकडून वारंवार त्यांच्या लग्नातील फोटो पाहिले जात आहेत. त्यात दिशाचं मंगळसूत्र भलतंच भाव खाऊन गेलं आहे. साधं असूनही डिझाइनमुळे मंगळसूत्राला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. दिशाने मंगळसूत्रासाठी साधी डिझाइन निवडली आहे. जास्त लांबीचं मंगळसूत्र न घेता तिने छोट्या मंगळसूत्राला पसंती दिली आहे. मंगळसूत्रात हिऱ्यांपासून बनवलेलं पेंडण्ट आहे. तशी ही फॅशन सध्या ट्रेण्डमध्ये आहे. त्यात दिशानेही याच फॅशननुसार मंगळसूत्राची निवड केली आहे. यापूर्वी अभिनेत्री सोनम कपूरचं मंगळसूत्रदेखील सोशल मीडियावर चर्चेत होतं. त्यासोबत प्रियांका चोप्रा आणि यामी गौतम यांच्या मंगळसूत्राने देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. नुकतंच लग्न झाल्याने राहुल आणि दिशाने काही दिवस कामापासून दूर राहत आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर सध्या देशात असलेल्या करोनाच्या धोक्यामुळे त्यांनी हनीमूनला जाण्याचं देखील टाळलं आहे. दिशा आणि राहुल सध्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडीपैकी एक आहेत यात काही शंका नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3z74Ksy