नवी दिल्ली : आपल्या पोर्टफोलियोचा विस्तार करत एचपीने भारतात नेक्स्ट-जेनरेशन मेनस्ट्रीम गेमिंग पीसी ला लाँच केले आहे. एएमडी रायझन प्रोसेसरसह येणाऱ्या ई सीरिजच्या विक्ट्सची सुरुवाती किंमत ६४,९९९ रुपये आहे. हा अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध आहे. विक्ट्स बाय एचपी डी सीरिजच्या इंटेल ११ th प्रोसेसरसह येणाऱ्या लॅपटॉपची सुरुवाती किंमत ७४,९९९ रुपये आहे. हा लॅपटॉप पुढील काही दिवसात रिलायन्स डिजिटल स्टोर्सवर उपलब्ध असेल. वाचा: एचपी इंडिया मार्केटचे वरिष्ठ डायरेक्टर (पर्सनल सिस्टम्स) विक्रम बेदी म्हणाले की, गेल्या काही वर्षातील गेमिंगची वाढती लोकप्रियता पाहता भारतातात गेमिंग बूमची शक्यता आहे. भारतातील युवकांसाठी गेमिंग हे संगीत व इतर अन्य खेळांप्रमाणेच एक आवड होत चालली आहे. नवीन गेमिंग नोटबूकमध्ये मीका सिल्वर आणि परफॉर्मेंस ब्लू या रंगात १६ इंचाच्या आकर्षक डिझाइन लॅपटॉपचा समावेश आहे. जो नवीन आणि अनुभवी गेमर्ससाठी योग्य ठरेल. लॅपटॉपमध्ये मिळेल लेटेस्ट कूलिंग सिस्टम लॅपटॉप अनुभवी आणि नवीन अशा दोन्ही गेमर्ससाठी डिझाइन करण्यात आला आहे. विक्ट्स एचपीला पॉवरफूल ओएमईएम गेमिंग लाइनअपच्या डीएनएसोबत बनवण्यात आला आहे. हा भारतात एएमडी रायझन आणि इंटेल क्रोर अशा दोन प्रोसेसर पर्यायासह येतो. दोन्ही मॉडेल आयपीएस १४४ हर्ट्ज डिस्प्ले, बँक अँड ओल्फसेनचे ऑडिओ, बॅकलिट गेमिंग कीबोर्ट, पॉवरफूल Nvidia GeForce RTXTM ग्राफिक्स आणि एक लेटेस्ट कूलिंग सिस्टमसह येतात. वाचा: प्री-इंस्टॉल ओमेन गेमिंग हबसह डिव्हाइस अंडरवोल्टिंग, परफॉर्मेंस मोड, नेटवर्क बूस्टर आणि सिस्टम वाइटल्स सारख्या सुविधा प्रदान करते. एचपी इंडियाच्या गेमिंग लँडस्केप रिपोर्ट २०२१ नुसार, जवळपास ६० टक्के भारतीय गेमर्स गेमिंग पीसीसाठी १ लाख रुपयांपेक्षा कमी खर्च करू इच्छितात. विक्ट्स पोर्टफोलिया त्यांच्यासाठी चांगला गेमिंग पीसी ठरेल. रिपोर्टनुसार, गेमर्ससाठी पीसी गेमिंग हे थकवा घालवणारे व मित्र-नातेवाईकांशी जोडण्याचे एक टूल आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l13FPm