मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चर्चेत आहे. ही चर्चा बॉलिवूडमधील चित्रपटासंदर्भातील नसून बॉलिवूडमधील अनेक काळ्या बाजू दाखणारी आहे. अभिनेता याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड हादरलं आहे. बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन समोर आलंय. यात अभिनेत्री हिनं बॉलिवूड , मुंबई ,मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकावर टीका करत अनेक प्रकारचे आरोप केलेत. कंगनानं मुंबईला पाकव्याप्त काश्मिर म्हटल्यानंतर अनेक कलाकारांनी कंगानावर निशाणा साधला होता. आता मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक यानं देखील कंगनाला चांगेलच घडेबोल सुनावलेत. 'राजकीय सुपारी घेऊन या मातीशी बेईमानी करू नका; असं त्यानं म्हटलं आहे. समीर आशा पाटील यानं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमधून त्यानं कंगनाला चांगलंच सुनावलं आहे. 'ज्या बाईला दादासाहेब आणि बाबासाहेब यातला फरक माहित नाही. ती लोकांना शहाणपणा शिकवतेय. बाबासाहेबांमुळे तुमचं अस्तित्व आहे आणि दादासाहेबांमुळे तुमची ओळख. हे विसरू नका. मुंबई आणि ही चित्रपट सृष्टी अनेकांच्या घामाने बनली आहे. अशा विष पेरणाऱ्या लोकांमुळे नाही. वयक्तिक स्वार्थासाठी, किंवा राजकीय सुपारी घेऊन ह्या मातीशी बेईमानी करू नका. कमीत कमी ह्या मातीत जन्मलेल्या लोकांनी तरी तिच्या सुरात सुर मिसळू नका. सरकार येतील जातील, कधी ह्या पक्षाचे कधी त्या पक्षाचे. पण ही भूमी बदनाम केल्याचे पाप आपण कुठे फेडू. इथे सगळेच गर्दुल्ले नाहीत. माझ्यासारखे सिनेमाची नशा घेऊन जगणारे अनेक लोकांना मी ओळखतो..!; असं त्यानं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33u6HkI