Full Width(True/False)

शानदार कॅमेरा आणि पॉवरफूल बॅटरीसह टेक्नोचे ‘हे’ स्मार्टफोन्स भारतात लाँच, पाहा किंमत

नवी दिल्ली : इंडियाने भारतीय बाजारात आपले दोन नवीन लाँच केले आहेत. यात आणि चा समावेश आहे. CAMON १७ च्या या फोनमध्ये अल्ट्रा नाइट लेंस देण्यात आली आहे. यासोबत TAIVOS टेक्नोलॉजी आहे. तसेच, पॉपअप सेल्फी कॅमेऱ्यासह ऑटो आय फोकस सपोर्ट मिळेल. वाचाः TECNO CAMON 17 Pro आणि TECNO CAMON 17 ची किंमत या दोन्ही फोन्सची विक्री २६ जुलैपासून अ‍ॅमेझॉनवर प्राइम डे सेलमध्ये होईल. टेक्नो कॅमोन १७ प्रोची किंमत १६,९९९ रुपये आहे. यासोबत ग्राहकांना १,९९९ रुपये किंमतीचे TECNO Buds1 मोफत मिळेल. तर TECNO CAMON 17 ची किंमत १२,९९९ रुपये आहे. TECNO CAMON 17 Pro चे स्पेसिफिकेशन या स्मार्टफोनमध्ये ६.८ इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून, ज्याचा स्क्रीन टू बॉडी रेशियो ९०.५ टक्के, डिस्प्ले ब्राइटनेस ५०० निट्स, रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोन अँड्राइड ११ आधारित Hi०७.६ वर काम करतो. यात ८ जीबी LPDDR४x रॅमसह १२८ जीबी स्टोरेज मिळेल. स्टोरेजला मेमरी कार्डद्वारे २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोन मीडियाटेक हीलियो जी९५ प्रोसेसरसह येतो. वाचाः TECNO CAMON 17 Pro चा कॅमेरा या फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. यातील प्रायमरी लेंस ६४ मेगापिक्सल, दुसरा ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल, तिसरा २ मेगापिक्सल बोकेह आणि चौथा २ मेगापिक्सल मोनोक्रोम सेंसर आहे. तर फ्रंटला ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. Tecno Camon 17 Pro ची बॅटरी फोनमद्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. कंपनीचा दावा आहे की बॅटरी ८३ मिनिटात फूल चार्ज होते. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि ड्यूल स्पीकर मिळेल. Tecno Camon 17 चे स्पेसिफिकेशन Tecno Camon 17 मध्ये ६.६ इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात मीडियाटेक हीलियो जी८५ प्रोसेसर, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळतो. Tecno Camon 17 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात प्रायमरी लेंस ४८ मेगापिक्सल, दुसरा २ मेगापिक्सलचा आणि तिसरा लेंस एआय सेंसर आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. यात देखील साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3B4l7Ii