मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्येच नेहा कक्करनं बॉयफ्रेंड रोहनप्रीतशी लग्न केलं. सोशल मीडियावर या जोडीचा रोमँटिक अंदाज नेहमीच पाहायला मिळतो. या जोडीचा बराच मोठा चाहतावर्गही आहे. सुरुवातीला 'इंडियन आयडल १२'ची परीक्षक म्हणून काम पाहणारी नेहा कक्कर मागच्या काही काळापासून मात्र या शोमध्ये दिसत नाहीये. तिच्या जागी तिची बहीण सोनू कक्कर या शोची परीक्षक म्हणून काम पाहत आहे. अशात आता सोशल मीडियावर नेहा कक्कर प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. मागच्या काही काळापासून सर्व इव्हेंट आणि 'इंडियन आयडल १२'पासून दूर असलेली नेहा कक्कर नुकतीच मुंबई एअरपोर्टवर पती रोहनप्रीतसोबत दिसली. यावेळी नेहानं सैल शर्ट आणि पॅन्ट घातली होती. ब्लॅक गॉगल्स आणि ब्लॅक मास्कमध्ये यावेळी नेहा वेगळ्याच अवतारात दिसली. तिच्या अशा आउटफिट्स आणि या व्हायरल व्हिडीओमुळे तिचे चाहते, ती प्रेग्नन्ट असल्याचा अंदाज लावताना दिसत आहेत. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओच्या कमेंटमध्ये नेहा प्रेग्नन्ट आहे का? असा प्रश्न विचारला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नेहाची पती रोहनप्रीत तिची पूर्ण काळजी घेताना दिसत आहे. तो तिचा हात पकडून चालताना दिसत आहे. एवढंच नाही तर कारमध्ये बसतानाही तो तिला मदत करताना दिसत आहे. त्याआधी या दोघांनी फोटोग्राफर्संना पोझ दिल्या. त्यानंतर अनेक चाहत्यांनी कमेंट करत नेहाच्या प्रेग्नन्सीबद्दल प्रश्न विचारले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच नेहा कक्करनं तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना आपल्या वाढलेल्या वजनावर चिंता व्यक्त केली होती. तसेच मला पूर्वीप्रमाणे व्हायचंय असंही तिनं हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं होतं. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'मला पुन्हा असं दिसायचं आहे. माहीत आहे मी फक्त १ किलो वजन कमी केलं आहे आणि मला अजून ५ किलो वजन कमी करायचं आहे.' हा व्हिडीओ इंडियन आयडल १२ च्या सुरुवातीचा आहे. त्याआधीही नेहानं तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात ती वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट करताना दिसली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ib6UR6