Full Width(True/False)

सॅनिटायजरप्रमाणे आता खिशात घेऊन फिरता येणार ऑक्सिजन, रुग्णांचा जीव वाचणार, किंमत खूपच कमी

नवी दिल्लीः करोना व्हायरसच्या महामारीत दुसऱ्या लाटेत भारतात मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्व कळाले आहे. करोना व्हायरसचे संकट अजून गेलेले नाही. लोकांना अजूनही मास्क आणि सॅनिटायर वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, आता सॅनिटायर सोबत ऑक्सिजन सुद्धा खिशात घेऊन फिरता येवू शकणार आहे. हो, हे खरे आहे. कानपूर मधील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी हे करून दाखवले आहे. ऑक्सिजनची बाटली आता आपल्या सोबत ठेवता येवू शकणार आहे. जाणून घ्या या संबंधी डिटेल्स. वाचाः इतकी आहे किंमत आयआयटी कानपूरचा माजी विद्यार्थी आणि ई-स्पिन नॅनोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे डॉ. संदीप पाटीलने ऑक्सीराइज नावाची बॉटल बनवली आहे. ज्यात १० लीटर ऑक्सिजनची गॅस स्टोर केले जाऊ शकते. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे, अचानक कोणाची तब्येत बिघडली तर त्याला या बॉटल मधून ऑक्सिजन दिले जावू शकते. हॉस्पिटल पर्यंत त्या रुग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो. खूपच कमी किंमतीत या बॉटलची किंमत आहे. ती म्हणजे फक्त ४९९ रुपये आहे. याला तुम्ही ऑनलाइन सुद्धा खरेदी करू शकता. वाचाः तोंडात स्प्रे मारून देऊ शकता ऑक्सिजन डॉ. संदीप पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे महामारी दरम्यान, ऑक्सिजनच्या या गंभीर समस्येवर उपाय शोधला आहे. हे पोर्टेबल आणि इमरजन्सी मध्ये खूप कामी येवू शकते. पाटीलच्या माहितीनुसार, बाटलीला एका खसा डिव्हाइस लावले आहे. याच्याद्वारे रुग्णाच्या तोंडात स्प्रे करून त्याला ऑक्सिजन दिले जाऊ शकते. याची विक्री कंपनीची वेबसाइट swasa.in वरुन केली जात आहे. आता एका दिवसात १ हजार बाटल्याचे प्रोडक्शन केले जात आहे, असे पाटील यांनी सांगितले. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yST9gI