Full Width(True/False)

अभिनेत्याने घेतली ८ कोटींची गाडी, पण बसला १ लाखाचा दंड

चैन्नई- दाक्षिणात्य याने काही वर्षांपूर्वी एक महागडी गाडी विकत घेतली. ही गाडी इतकी वापरली की ती आता जुनीही झाली. पण नेमकी याच गाडीमुळे आता तो अडचणीत आला आहे. हे प्रकरण जरा जुनंच आहे. २०१२ मध्ये विजयने इंग्लंडवरून एक महागडी गाडी मागवली होती. या गाडीची किंमत ७ कोटी ९५ लाख रुपये होती. मात्र गाडी विकत घेताना विजयने गाडीसाठी द्यावा लागणारा कर भरला नव्हता. एवढंच नाही तर करमाफी मिळावी यासाठीही त्याने सरकारकडे विनंती केली होती. आता यावर मद्रास सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय आला असून अभिनेत्याला कर न भरल्यामुळे १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विजयच्या संकटात वाढ न्यायमूर्ती एस.एम. सुब्रमण्यम यांनी विजयची याचिका फेटाळली आणि मास्टर सिनेमाचा अभिनेता विजयला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. एवढंच नाही तर पुढच्या दोन आठवड्यांमध्ये हा दंड तामिळनाडू मुख्यमंत्री कोविड- १९ मदत निधीमध्ये टाकण्याचे आदेश न्यायमूर्तीने दिले. याशिवाय त्याला दोन आठवड्याच्या आत गाडीचा कर भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला. दोन आठवड्यात द्यावा लागेल कर न्यायमूर्ती म्हणाले की, अभिनेत्याने आपल्या सिनेमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचं काम केलं. पण खऱ्या आयुष्यात मात्र तो असं काही करताना दिसत नाही. विजयने नेहमीच एक चांगला शासक असलेल्या भूमिका केल्या. चाहत्यांमध्येही तो त्यांचं हे रूप सांभाळत आला आहे. कर भरणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि दान करण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. विजयकडे आहेत अनेक महागड्या गाड्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजयची कोट्यवधींची मालमत्ता तर आहेच शिवाय त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचा ताफाही आहे. त्याच्याकडे बीएमडब्लू मिनी कॉपर, ऑडी A8, आणि रोल्स रॉयस घोस्ट यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. विजयच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा शेवटचा सिनेमा मास्टर होता. याशिवाय तो आता अब बीस्ट सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमात त्याच्यासोबत पूजा हेगडे दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36AZNfy