Full Width(True/False)

पहिल्या घटस्फोटानंतर आमिरची झाली होती वाईट अवस्था, सलमान खाननं केली होती मदत

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आणि यांनी शनिवारी घटस्फोट घेत वेगळं झाल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. आमिर खान आणि किरण यांच्यात असं काही घडेल याची कोणी कल्पना देखील केली नसेल. आमिरच्या या घटस्फोटामुळे जसा चाहत्यांना धक्का बसला आहे तसाच धक्का काही वर्षांपूर्वी आमिर खानलाही त्याच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यावर बसला होता. आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांचं १९८६ साली लग्न झालं होतं. लग्नाच्या १६ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला होता. पण या घटस्फोटानंतर आमिर खान मानसिक पातळीवर खचला होता. ज्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला सलमान खाननं फार मोठी मदत केली होती. ज्याचा खुलासा आमिरनं स्वतः करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये केला होता. आमिर खान म्हणाला होता, 'मी जेव्हा माझ्या आयुष्यातल्या सर्वात कठीण काळातून जात होतो. तेव्हा सलमान माझ्या आयुष्यात आला. माझा आणि माझ्या पत्नीचा घटस्फोट झाला होता. तेव्हा अचानक एकदा मला सलमान भेटला आणि त्यानं त्यावेळी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही पुन्हा भेटलो. एकत्र बसून ड्रिंक्स घेतली आणि नंतर आम्ही मित्र झालो. त्यानंतर सलमानसोबत चांगल्या मैत्रीची सुरुवात झाली.' दरम्यान घटस्फोट घेतल्याचं जाहीर करत असताना आपल्या निवेदनात किरण आणि आमिरनं लिहिलं, 'आम्ही १५ वर्ष एकत्र काढली. आम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगलो आणि आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम वाढतच गेले. आता आपण आपल्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करू. हा अध्याय पती- पत्नीसारखा नसेल, पण सह-पालक आणि कुटुंब म्हणून आपण एकत्र असू. आम्ही काही महिन्यांपूर्वी वेगळं होण्याचा विचार केला होता. आता अधिकृतरित्या वेगळे होत आहोत. आम्ही मुलगा आझादचे सह-पालक असू आणि एकत्र त्याची काळजी घेऊ. आम्ही सिनेमांसाठी आणि आपल्या पानी फाऊंडेशनसाठी एकत्र काम करत राहू.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qTvaev