Full Width(True/False)

आधार कार्ड हरवलेय?, चिंता करू नका, या टिप्स वापरून आधार संबंधित काम करा

नवी दिल्लीः आधार कार्ड (Aadhaar Card) आज प्रत्येक व्यक्तीसाठी एक आवश्यक डॉक्यूमेंट्स बनले आहे. आधार कार्ड विना कोणतेही काम करणे आता कठीण बनले आहे. आधार कार्ड मध्ये व्यवस्थित डिटेल्स असणे गरजेचे आहे. आधार कार्ड बनवताना या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जर तुमचे आधार हरवले असेल तर तुमचे कोणतेही काम थांबू नये, यासाठी UIDAI ने एका नियमात बदल केला आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः आधार कार्ड नसल्यास या डॉक्यूमेंटचा वापर करू शकता आधार लेटर (Aadhaar Letter), ई-आधार (eAadhaar), एमआधार (mAadhaar) आणि आधार पीवीसी कार्ड (Aadhaar PVC Card) हे असेल तर तुमचे रखडलेले काम मार्गी लागू शकते, असे यूआयडीआयने सांगितले आहे. वाचाः आधार लेटर, ई-आधार, एमआधार संबंधित आवश्यक गोष्टी आधार पत्र (Aadhaar Letter) किंवा कोणतेही कागदावर आधार कार्डला डाउनलोड केलेले पूर्णपणे वैध आहे. जर कोण्या व्यक्तीकडे एका कागदावर आधार कार्ड असेल तर तेही पूर्णपणे वैध आहे. किंवा आधार कार्डला लॅमिनेट केल्यास किंवा पैसे देवून तथाकथित स्मार्ट कार्ड करण्याची गरज नाही. वाचाः जर कोणी व्यक्ती आधार कार्ड हरवल्यास आपल्या आधार कार्डला निशुल्क https://eaadhaar।uidai।gov।in वरून डाउनलोड करू शकता. याला प्लास्टिक किंवा पीसीवर छापण्याची कोणतीही आवश्यकता नाही. वाचाः एमआधार (mAadhaar) आधारचे अधिकृत अॅप आहे. या अॅप मध्ये तुम्ही तुमचे आधार सुरक्षित ठेवू शकता. आधार कार्ड नसल्यास तुम्ही mAadhaarला पूर्णपणे युज करू शकता. या अॅप सोबत संबंधित ३५ हून जास्त आधार सेवा देते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xjV10B