Full Width(True/False)

ना ब्लू टिक ना चेकमार्क, असे माहित करा गृप चॅटमधील तुमचा मेसेज वाचला की इग्नोर झाला, पाहा टिप्स

नवी दिल्ली: संपूर्ण जगातच मित्र आणि प्रियजनांशी गप्पा मारण्यासाठी व्हॉट्सअॅप हे एक उत्तम मोबाइल अॅप आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती चा वापर करते. यातील फीचर्स देखील भन्नाट आहेत. WhatsApp मध्ये कोणी मेसेज पाठवला, तो समोरच्या व्यक्तीपर्यंत तो पोहोचला की नाही. इतकेच काय तर, तो मेसेज तुमच्या मित्र- मैत्रिणींनी वाचला की नाही हे सुद्धा माहित करता येते. ग्रुप चॅट विषयी बोलायचे तर, तुम्ही गृपमध्ये पाठविलेल्या मेसेजवर ब्लू टिक असेल तर तुमचा मेसेज सर्व ग्रुप सदस्यांनी वाचला आहे. पण, जर त्यावर ब्लू टिक नसेल तर मेसेज कोणत्या गृप मेंबरने वाचला आहे हे देखील काही टिप्सच्या मदतीने सहज माहित करता येते. वाचा: Android युजरने असे चेक करावे तुम्ही पाठवलेल्या मेसेजवर प्रेस आणि होल्ड करून ठेवा त्याच्या भोवती वर्तुळासह "i" पर्याय असेल. त्यावर टॅप केल्यावर तुम्हाला कळेल की मेसेज कोणाकडे गेला आहे आणि कोणी वाचला आहे. iPhone युजरने कसे तपासावे प्रथम तुम्हाला ग्रुप चॅट उघडावे लागेल. मग तुम्ही पाठवलेला मेसेज उजवीकडून डावीकडे स्वाइप करावा लागतो. हे फीचर मेसेज कोणाकडे गेला आहे आणि कोणी वाचला आहे हे दर्शविते. तुम्ही पाठवलेल्या प्रत्येक मेसेजच्या पुढे चेक मार्क दिसतील.
  • क्लॉकमार्क: मेसेज पाठवला जात आहे.
  • एक ग्रे चेकमार्क: व्हॉट्सअॅप मेसेज यशस्वीरित्या पाठविला गेला आहे परंतु तो पोहोचला नाही
  • दोन ग्रे चेकमार्क: व्हॉट्सअॅप मेसेज पोहोचला आहे.
  • दोन ब्लू चेकमार्क: तुमचा मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचला आहे.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fbWBeU