नवी दिल्ली : वियरेबल टेक्नोलॉजी कंपनी ने भारतात एक शानदार TicWatch GTH ला लाँच केले आहे. या वॉचला Skin Temperature Measurement फीचरसोबत सादर करण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने वॉच बॉडी टेंप्रेचरची माहिती देईल. एवढेच नाही तर यात अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टवॉचची भारतातील किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया. वाचाः Mobvoi TicWatch GTH चे स्पेसिफिकेशन्स हाय स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसोबत येणाऱ्या या वॉचमध्ये १.५५ इंच कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. वॉच ५ एटीएम वॉटरप्रूफ रेटिंगसोबत येते व यात २.५डी कर्व्ड ग्लास स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीनुसार, ही पहिली अशी TicWatch आहे, ज्यात को Skin Temperature Measurement फीचर देण्यात आले आहे. स्मार्टवॉचमध्ये २६०एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, सिंगल चार्जमध्ये वॉचची बॅटरी १० दिवस टिकेल. TicWatch GTH स्लीप ट्रॅकिंग फीचर सोबत येते, याद्वारे तुम्ही स्लीप परफॉर्मेंसला ट्रॅक करू शकता. वाचाः या वॉचमध्ये तुम्हाला SpO2 Sensor मिळेल, जे ब्लड ऑक्सिजन लेव्हलला ट्रॅक करण्यास मदत करेल. या व्यतिरिक्त २४ तास हार्ट रेट मॉनिटरिंगची सुविधा मिळेल. या वॉचमध्ये इंनडोर आणि आउटडोर रनिंग, वॉकिंग, जंप रोप, इनडोर आणि आउटडोर सायकलिंग, फ्रीस्टाइल एक्सरसाइज, रोइंग योगासह १४ स्पोर्ट्स मोड दिले आहेत. Mobvoi TicWatch GTH ची किंमत भारतीय बाजारात ही वॉच ४,७९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या वॉचला ई-कॉमर्स साइट वरून खरेदी करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k0r7eT