मुंबई: ''ची सुरुवात अगदी दमदार अंदाजात झाली आहे. शोच्या सुरुवातीपासूनच खतरनाक स्टंट्स सुरू झाले आहे. शोच्या सुरुवातीला काही स्पर्धकांनी आपापला टास्क अगदी उत्तम प्रकारे पूर्ण केले. पण काहींनी मात्र टास्क पाहताच ते करण्यास नकार दिला. शो सुरू झाल्यानंतर दिव्यांका त्रिपाठी, , अर्जुन बिजलानी, सना मकबूल यांच्या परफॉर्मन्सनंतर त्यांचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे. रविवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये पार्टनर टास्क देण्यात आला होता. ज्यात वरुण सूद आणि महक चहल यांच्या जोडीनं आणि सना मकबूल या जोडीला मात दिली. दोन्ही जोड्यांनी टास्क पूर्ण केला पण वरुण- महक यांनी विशाल-सना पेक्षा कमी वेळात टास्क पूर्ण केल्यानं ते विजेता ठरले. दुसऱ्या टास्कमध्ये अनुष्का सेन आणि यांच्यात स्पर्धा होती. ज्यात अनुष्कानं आपला टास्क पूर्ण केला मात्र निक्कीनं हा टास्क करण्यास नकार दिला. या टास्कमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून शरिरावर ठेवण्यात आलेला प्राणी ओळखायचा होता. निक्कीनं याआधीही पहिला टास्क करण्यास नकार दिला होता. 'खतरों के खिलाडी ११'च्या या टास्कमध्ये जेव्हा निक्की तांबोळी घाबरली तेव्हा तिला घाबरलेलं पाहून तिचा मित्र अभिनव शुक्ला धावत तिच्याकडे गेला. पण यामुळे रोहित शेट्टीच्या रागाचा पारा चढला. तो म्हणाला, 'मला सर्व स्पर्धकांची सर्वाधिक चिंता आहे. शोचा एक प्रोटोकॉल आहे ज्याच पालन करण बंधनकारक आहे.' त्यानंतर निक्कीवरही भडकला. तो म्हणला, 'आपण एखाद्याची मस्करी करणं आणि कोणी आपल्यावर हसणं यात फरक असतो. तू हा शो आधीही पाहिला असेलच. अशाचप्रकारे कठीण टास्क असतात. पुढे आणखी कठीण होत जातील. शो साइन करण्याआधी हे माहीतच असतं की या सर्व गोष्टी होणार आहेत. मग तेव्हा विचार नाही केला का?' अखेर विशाल आदित्य सिंह आणि निक्की तांबोळी यांच्यात एक टास्क झाला. जो विशालनं व्यवस्थित पूर्ण केला. पण निक्कीनं पुन्हा एकदा टास्क करण्यास नकार दिला. यानंतर सर्व स्पर्धकांनी वोट दिले. ज्यात सर्वाधिक कमी वोट निक्कीला मिळाले. ती सर्वात कमकुवत स्पर्धक मानली गेली. कारण तिनं तिचा प्रत्येक टास्क अबॉर्ट केला होता. तिने एकही टास्क पूर्ण केला नाही. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात निक्की या शोमधून बाहेर पडली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3isZJnH