मागील आठवडा टेक युजर्ससाठी चांगला होता. या दरम्यान,अनेक नवीन डिव्हाइसेस लाँच करण्यात आली. अशा बर्याच फोनने भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केली. ज्याची युजर्सना बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. यात ओप्पोची सर्वात लोकप्रिय मालिका Reno 6, Vivo S 10 मालिकेसारख्या फोनचा समावेश आहे. काही कारणास्तव जर तुम्ही गेल्या आठवड्यातील नवीन कोणत्याही लाँच चुकवला असेल किंवा तुम्हाला त्या लाँचचबद्दल आणि डिव्हाइसेसच्या फीचर्स, किमतीबाद्ल माहिती मिळविता आली नसेल. तर, काळजीचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या सर्व स्मार्टफोनची विस्तृत माहिती देत आहोत. यात केवळ भारतातच नाही, तर बाहेर लाँच झालेल्या फोनविषयी देखील माहिती देत आहे. Realme पासून Vivo पर्यंत अनेक पर्याय समाविष्ट असून या स्मार्टफोनमध्ये अनेक मजबूत वैशिष्ट्य देण्यात आली आहे.
मागील आठवडा टेक युजर्ससाठी चांगला होता. या दरम्यान,अनेक नवीन डिव्हाइसेस लाँच करण्यात आली. अशा बर्याच फोनने भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केली. ज्याची युजर्सना बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. यात ओप्पोची सर्वात लोकप्रिय मालिका Reno 6, Vivo S 10 मालिकेसारख्या फोनचा समावेश आहे. काही कारणास्तव जर तुम्ही गेल्या आठवड्यातील नवीन कोणत्याही लाँच चुकवला असेल किंवा तुम्हाला त्या लाँचचबद्दल आणि डिव्हाइसेसच्या फीचर्स, किमतीबाद्ल माहिती मिळविता आली नसेल. तर, काळजीचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या सर्व स्मार्टफोनची विस्तृत माहिती देत आहोत. यात केवळ भारतातच नाही, तर बाहेर लाँच झालेल्या फोनविषयी देखील माहिती देत आहे. Realme पासून Vivo पर्यंत अनेक पर्याय समाविष्ट असून या स्मार्टफोनमध्ये अनेक मजबूत वैशिष्ट्य देण्यात आली आहे.
Vivo S 10 Pro
Vivo S10 Pro च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३,९९९ चीनी युआन म्हणजेच सुमारे ३९,००० रुपये आहे. हे मीडियाटेक डायमेंसिटी ११०० प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात ट्रिपल रीअर कॅमेरा आहे. त्याचा पहिला सेन्सर १०८ मेगापिक्सेल, दुसरा ८ मेगापिक्सल आणि तिसरा २ मेगापिक्सेल आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ४४ मेगापिक्सेल आणि ८ मेगापिक्सेलचा ड्युअल सेन्सर आहे.
Vivo S10
Vivo S10 च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २,७९९ चिनी युआन म्हणजे सुमारे ३२,००० रुपये आहे. तर,१२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २,९९९ चिनी युआन म्हणजे सुमारे ३५,००० रुपये आहे. Vivo S10 मध्ये ६.४४ इंचाचा डिस्प्ले आहे. हे मीडियाटेक डायमेंसिटी ११०० प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात ट्रिपल रीअर कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४०५० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
TECNO CAMON 17 Series
TECNO CAMON 17
किंमत एनजीएन ७४,००० म्हणजेच सुमारे १४,२०० रुपये आहे. यात ६x६० इंचाचा पिक्सल रिझोल्यूशनसह ७२०x१६०० आहे. हा फोन Android ११ वर काम करतो. हे मीडियाटेक हेलिओ जी ८ प्रोसेसरसह सुसज्ज आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
TECNO CAMON 17 P
किंमत एनजीएन ९७,००० म्हणजेच सुमारे १,८,७०० रुपये आहे. यात ६.८० इंचाचा डिस्प्ले आहे ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन १०८०x२४६० आहे. हा फोन Android ११ वर काम करतो. हे मीडियाटेक हेलिओ जी ८५ प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात क्वाड रियर कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
TECNO CAMON 17 Pro :
किंमत एनजीएन १२५,००० म्हणजेच सुमारे २४,१०० रुपये आहे. हे मीडियाटेक हेलिओ जी 95 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात क्वाड रियर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
vivo y72 5G
हे डिव्हाईस ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहे. फोनची किंमत किंमत २०,९९० रुपये आहे. फोनमध्ये ६.५८ इंचाची एफएचडी + डिस्प्ले आहे. त्याचे पिक्सेल रिझोल्यूशन २४०० x१०८०आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४८० ५ जी प्रोसेसरसह सुसज्ज आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे ज्याचा प्राथमिक सेन्सर ४८ मेगापिक्सेल आहे. दुसरा एक २ मेगापिक्सेलचा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेन्सर आहे.
Oppo Reno 6 5 G
Oppo Reno 6 5 G च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २९,९९० रुपये आहे. फोनमध्ये ६. ४३ इंचाचा डिस्प्ले आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी ९०० प्रोसेसरसह सुसज्ज आहे. हे Android ११ वर काम करते. फोनला शक्ती देण्यासाठी, ४३०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये एक ट्रिपल रियर कॅमेरा आहे, ज्याचा प्राथमिक सेन्सर ४८ मेगापिक्सेल आहे. दुसरे ८ मेगापिक्सेल आणि तिसरे २ मेगापिक्सेल आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.
Oppo Reno 6 Pro 5G
Oppo Reno 6 Pro 5 G १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३९,९९० रुपये आहे. फोनमध्ये ६.५५ इंचाचा डिस्प्ले आहे. त्याचे पिक्सेल रेझोल्यूशन १०८० x२४०० आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा उपलब्ध आहे, ज्याचे प्राथमिक सेन्सर ४८ मेगापिक्सेल आहे. दुसरे ८ मेगापिक्सेल, तिसरे २ मेगापिक्सेल आणि चौथे २ मेगापिक्सेल आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.
Realme C21Y
Realme C21Y स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत व्हीडीएन ३,७१०,००० म्हणजेच सुमारे १२,००० रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत व्हीडीएन ३,२४०,००० म्हणजेच सुमारे १०,५०० रुपये आहे.या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये एक ट्रिपल रियर कॅमेरा आहे, ज्याचे प्राथमिक सेन्सर १३ मेगापिक्सेल आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3etxXpK