मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि बिग बॉस कार्यक्रमातील एक स्पर्धक आणि तिचा नवरा हे एका व्हिडीओमुळे अडचणीत आले आहेत. संभावना आणि अविनाश यांचे युट्यूब चॅनेल आहे. ते एकमेकांसोबत विविध विषयांवर व्हिडीओ तयार करून चॅनेवर शेअर करत असतात. परंतु अलिकडेच या दोघांनी त्यांच्या चॅनेलवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका करत त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काय घडले नेमके संभावना आणि अविनाश यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर १६ जून रोजी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या घरी काम करणा-या घरकाम करणा-या महिलेच्या भाषेची मस्करी केली होती. ही घरकाम करणारी महिला झारखंड येथील आदिवासी समाजातील आहे. ती फोनवर तिच्या घरच्यांशी तिच्या भाषेत बोलत होती. या दोघआंनी तिचे बोलणे ऐकले. त्यानंतर या दोघांनी तिची आणि तिच्या भाषेची त्यांनी मस्करी केली. ही मस्करी करताना काही अपशब्द वापरले. हा व्हिडीओ या दोघांनी त्यांच्या चॅनेलवर शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका करत त्यांना ट्रोल केले. सातत्याने ट्रोलिंग होऊ लागल्याने त्यांनी हा व्हिडीओ युट्यूबवरून काढून टाकला आहे. तरी देखील तो व्हिडीओ व्हायरल झाल्याने सातत्याने त्यांच्यावर टीका होत आहे. चुकीची उपरती आणि माफीनामा याप्रकरानंतर संभावना आणि अविनाश यांनी एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ संभावनाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्या दोघांनी याप्रकरणी सगळ्यांची माफी मागितली आहे.ते म्हणाले, ' तो व्हिडीओ करण्यामागे केवळ लोकांना हसवणे हा एकच उद्देश होता. कोणत्याही समुदायाची खिल्ली उडवणे अथवा त्यांची मानहानी करण्याचा उद्देश नव्हता. आम्ही व्हिडीओ करताना स्क्रिप्ट लिहित नाही. लोकांचे मनोरंजन करण्याच्या नादात जर आमच्याकडून काही अपशब्द वापरले गेले. त्याबद्दल आणि या व्हिडीओप्रकरणी आम्ही संपूर्ण आदिवासी समाजाची माफी मागतो. आम्हाला या विषयी काही माहित नव्हते. तुम्ही सांगितल्यानंतर आम्हाला त्याबद्दल समजले...'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yALFyP