मुंबई: अभिनेत्री बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या करिनाच्या लव्ह लाइफ एकेकाळी चांगलीच गाजली होती. करिना कपूर आणि यांच्या डेटिंग आणि ब्रेकअप दोन्हीच्या जोरदार चर्चा झाल्या होत्या. दोघांनीही शेवटचं 'जब वी मेट' या चित्रपटात काम केलं होतं. पण या चित्रपटानंतर दोघांनीही आपले मार्ग बदलले. त्यानंतर करिनानं सैफ अली खानसोबत 'टशन' चित्रपटात काम केलं. पण या दोन्ही चित्रपटांनी आपलं आयुष्य बदलून टाकल्याचं करिनाचं म्हणणं आहे. अनेक चाहत्यांना माहीत आहे की, शाहिद कपूरनंच करिनाची 'गीत' या भूमिकेसाठी शिफारस केली होती. आता करिनानंही हे खरं असल्याचं मान्य केलं आहे. त्यावेळी शाहिदनं 'जब वी मेट'मध्ये माझ्यासाठी भूमिकेची विचारणा केल्याचं तिनं म्हटलं आहे. त्यावेळी करिनाच्या करिअर आणि वैयक्तीक आयुष्यालाही नवं वळणं मिळालं होतं. ज्याबद्दल ती आजही बोलते. करिना म्हणते, 'अर्थात 'टशन' चित्रपटानं माझं आयुष्य बदलून गेलं. मी सैफला या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते.' करिना आणि सैफ यांच्या लव्हस्टोरीला याच चित्रपटाच्या सेटवर सुरुवात झाली होती. त्याच वेळी करिना 'जब वी मेट'चं शूटिंग करत होती. या दोन्ही चित्रपटांननी करिनाचं आयुष्य बदलून टाकलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबत बोलताना करिना म्हणाली, 'मी यशराज फिल्मचा चित्रपट 'टशन' चं शूटिंग करत होते. पण त्याचवेळी दुसरीकडे 'जब वी मेट' चं शूटिंग सुरू होतं. जेव्हा मी या सेटवर असायचे तेव्हा नेहमीच, मी अक्षय कुमार, अनिल कपूर आणि यांच्यासोबत काम करतेय. मी मुख्य भूमिकेत आहे. साइझ झीरो होणार आहे, बिकिनी घालणार आहे. मी वजन कमी केलं आहे. अशा गप्पा मारत असे. 'जब वी मेट' च्या सेटवर मी अशाच मूडमध्ये असे.' करिना पुढे म्हणाली, 'पण माझ्या नशीबात काही वेगळंच लिहिलं होतं. 'जब वी मेट' आणि 'टशन' दोन्ही चित्रपटामध्ये माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या. 'जब वी मेट'नंतर एकीकडे शाहिद आणि मी वेगळे झालो आणि दुसरीकडे चित्रपट सुपरहिट झाला. 'टशन' चित्रपटानं माझं आयुष्य बदललं. मी सैफला भेटले. मला वाटलं होतं की 'टशन'मुळे माझं करिअर आणि लाइफ दोन्ही बदलेल. पण शाहिदच्या 'जब वी मेट' नं माझं करिअर आणि सैफच्या 'टशन' नं माझं आयुष्य बदललं. मला माझ्या स्वप्नातला राजकुमार मिळाला आणि मी त्याच्याशी लग्न केलं.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3AVcRKF