Full Width(True/False)

'असले फोटो काढायला वाघाचं काळीज पाहिजे'; चाहत्याच्या कमेंटवर अमृतानं दिलं असं उत्तर की...

मुंबई: मराठी सिनेअभिनेत्री सोशल मीडियावर सक्रीय असते. आपल्या नवनवीन फोटोंनी ती चाहत्यांना तिच्याबद्दल नेहमीच अपडेट देत असते. नुकतंच तिनं स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यात मादक दिसत आहे. अमृतानं काळ्या रंगाच्या पंजाबी सुटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसतेय. चाहत्यांकडून या फोटोंवर लाइक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. एका चाहत्यानं अशी काही प्रतिक्रिया दिली की अमृतानं त्या कमेंटला उत्तर दिलं आहे. एका युझरनं अमृताच्या फोटोंवर कमेंट करताना लिहिलं की, 'हे असले घातक फोटोशूट करताना वाघाचं काळीज पाहिजे फोटोग्राफरचे'. या युझरच्या कमेंटला अमृतानंही उत्तर दिलंय. 'आईने काढलेत फोटो' असं उत्तर अमृतानं दिल्यानंतर चाहत्यांनी अमृता आणि तिची आई या दोघींचं कौतुक केलंय. 'मग आई वाघीण आहे, असंही एका युझरनं म्हटलंय. अमृताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर '', 'सत्यमेव जयते', 'मलंग' अशा हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री झळकली. या चित्रपटांमध्ये तिनं साकारलेल्या भूमिकांचं कौतुकही झालं. छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही तिनं वेळोवेळी तिच्या अदाकारीची कमाल दाखवली आहे. मध्यंतरी आलेल्या ' वेल डन बेबी ' या मराठी चित्रपटात ती झळकली आणि चाहत्यांना तिची ही भूमिकाही आवडली. आगामी काळातही सातत्यानं वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये आपण समोर येणार असल्याचं ती सांगते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hC4UCg