Full Width(True/False)

आमिर खानचं दुसरं लग्नही मोडलं, किरण रावला दिला घटस्फोट

मुंबई- बॉलिवूड अभिनेता याचे दुसरे लग्नही मोडले आहे. मीडिया रिपोर्टनुसार पत्नी आणि आमिर यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. २८ डिसेंबर २००५ रोजी या दोघांचे लग्न झाले. आमिर आणि किरण दोघांनी घटस्फोटाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत यासंंबंधीची माहिती दिली. लग्नाच्या १५ वर्षांनंतर लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या निवेदनात दोघांनी लिहिले की, 'आम्ही १५ वर्ष एकत्र काढली. आम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगलो आणि आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम वाढतच गेले. आता आपण आपल्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करू. हा अध्याय पती- पत्नीसारखा नसेल, पण सह-पालक आणि कुटुंब म्हणून आपण एकत्र असू. आम्ही काही महिन्यांपूर्वी वेगळं होण्याचा विचार केला होता. आता अधिकृतरित्या वेगळे होत आहोत. आम्ही मुलगा आझादचे सह-पालक असू आणि एकत्र त्याची काळजी घेऊ. आम्ही सिनेमांसाठी आणि आपल्या पानी फाऊंडेशनसाठी एकत्र काम करत राहू.' 'लगान' सिनेमाच्या सेटवर झालेली पहिली भेट आमिर खानने एका मुलाखतीत सांगितले होते की किरण आणि त्याची भेट लगान सिनेमाच्या सेटवर झाली. तेव्हा ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. आमिर म्हणाला की, 'अचानक एक दिवस मला किरणचा फोन आलेला. तेव्हा आम्ही जवळपास ३० मिनिटं बोललो. तिच्याशी बोलल्यानंतर मी इतका आनंदी झालो होतो की आनंदाने उड्या मारायला लागलो. मी आतून किती आनंदी आहे ते जाणवत होतं. त्यानंतर आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. एक- दोन वर्ष आम्ही एकमेकांना डेट केलं. याकाळात आम्ही एकत्र राहतही होतो. त्यानंतर मला जाणवायला लागलं की तिच्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचार करू शकत नाही. तिच्यातला सर्वात चांगला गुण म्हणजे ती एक सशक्त महिला आहे. यानंतर आम्ही नात्याला नाव देण्याचं ठरवलं आणि आम्ही लग्न केलं.' सरोगेसीच्या माध्यमातून मुलगा दिला जन्म किरण आणि आमिरला आझाद नावाचा मुलगा असून तो १० वर्षांचा आहे. आझादचा जन्म सरोगसीद्वारे झाला. गर्भधारणेत अडचणी आल्यामुळे किरण आणि आमिरनने सरोगेसीचा निर्णय घेतला. त्यानंतर २०११ मध्ये आझादचा जन्म झाला. पहिले लग्न २००२ मध्ये तुटले आमिर खानने पहिले लग्न रिना दत्ताशी केले होते. 'कयामत से कयामत तक' सिनेमाचं शूटिंग सुरू असताना आमिरने रीनाशी लग्न केले होते. १८ एप्रिल १९८६ रोजी केलेलं हे लग्न जवळपास १६ वर्ष चाललं. २००२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. रिना आणि आमिराल जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. ही दोन्ही मुलं आई रिनासोबतच राहतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ymLDKz