मुंबई- बॉडीगार्ड असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सर्वात आधी सलमान खानचा अंगरक्षक शेराचा चेहरा समोर येतो. पण आज आम्ही तुम्हाला शेराबद्दल नाही तर चा अंगरक्षक सोनूबद्दल बोलणार आहोत. सोनू जरी शेरा इतका प्रसिद्ध नसला तरी त्याचा दर्जा शेरापेक्षा तसुभरही कमी नाही. कोट्यवधी पगार घेणारा सोनू हा नेहमी अनुष्कासोबत तिची सावली बनून जीवन जगत आहेत. सोनूचे पूर्ण नाव प्रकाश सिंह आहे, पण अनुष्का प्रेमाने त्याला सोनू म्हणते. जेव्हाही अनुष्का घरातून बाहेर पडते तेव्हा सोनू तिच्यासोबतच असतो. सोनू अनुष्का शर्माच्या सुरक्षेबद्दल नेहमी जागरुक राहतो आणि जरासुद्धा चूक होऊ देत नाही. असं क्वचितच घडलं असेल की सोनू अनुष्कासोबत दिसला नसेल. सोनू नेहमीचकरड्या रंगाच्या सफारी सूटमध्ये अनुष्काच्या मागे उभा राहिला आहे. अनुष्का त्याच्याशी घरातील सदस्यांप्रमाणेच वागवते आणि यामुळेच प्रत्येक वर्षी अभिनेत्री सोनूचा वाढदिवस तिच्या स्टाइलमध्ये सेलिब्रेट करते. जेव्हापासून अनुष्का शर्माचे लग्न झाले. सोनू विराट कोहलीलाही संपूर्ण संरक्षण देतो. सोनू विराट-अनुष्काच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतो. अनुष्का शर्माच्या अंगरक्षक सोनूची वार्षिक फी १.२ कोटी रुपये इतकी आहे. म्हणजेच अनुष्का सोनूला दरमहा १० लाख रुपये इतका पगार देते. सध्या अनुष्का शर्मा मुलगी वामिका आणि पती विराट कोहलीसमवेत लंडनमध्ये वेळ घालवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्काने २०२२ पर्यंत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलीची पूर्ण काळजी घेतल्यानंतरच अनुष्का सिनेमांत काम करायला सुरुवात करणार आहे. यासह ती सध्या तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे कामदेखील पाहत आहे. अनुष्काचे प्रॉडक्शन हाऊस लवकरच 'पाताल लोक २' आणि 'काला' यासह अनेक प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. अनुष्का शर्माने 'झिरो' सिनेमात शेवटचे काम केले होते. या सिनेमात तिच्यासोबत शाहरुख खान आणि कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qHxANj