पणजी- टेनिस जगातील सुपरस्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्यांचे काही रोमॅण्टिक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही समुद्र किनाऱ्यावर एकमेकांसोबत निवांत वेळ घालवताना दिसत आहेत. लिअँडर आणि किमचे हे फोटो दोघांमध्ये असलेल्या अफेअरचा पुरावा देतात. याआधीही दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. पण त्या अफवा असल्याचं सांगण्यात आलं. पण आता गोव्यातले हे फोटोच सारं काही सांगत आहेत. लिअँडर आणि किमचे दोन फोटो व्हायरल झाले आहेत. यातील एका फोटोत ते आपल्या पाळीव श्वानासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते निवांत नाश्ता करताना दिसत आहेत. या फोटोंमधील दोघांची शैली पाहून हे स्पष्ट होतं की दोघं लवकरच या नात्यास अधिकृत बनवण्याच्या तयारीत आहेत. सध्या पेस आणि किम सुट्टीसाठी गोव्यात आहे. अलीकडेच ते सेलिब्रिटी हॉटस्पॉट रेस्तराँ Pousada By The Beach गाठले होते. या फोटोंवरून स्पष्ट होतं की दोघांनी समुद्रकाठ वसलेल्या या रेस्तरांमध्ये काही सुंदर क्षण एकत्रितपणे घालवले. किमने इन्स्टावर स्वत:चा एक फोटोही शेअर केला आहे. यात लिअँडर पेस दिसत नाही. याशिवाय तिने इन्स्टा स्टोरीवर तिला कसा साथीदार आणि कशा पद्धतीचं नातं हवं आहे हेही तिने सांगितलं आहे. किम शर्माच्या अफेअरबद्दल बोलायचं झालं तर अनेक वर्ष ती क्रिकेटपटू युवराज सिंगची प्रेयसी होती. युवराजसोबतच्या ब्रेकअपनंतर तिने केनियातील व्यावसायिका अली पुंजानीसोबत लग्न केले. पण २०१७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये हर्षवर्धन आणि किम पहिल्यांदा एकत्र दिसले. दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्याही बातम्या तेव्हा प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र २०१९ मध्ये हर्षवर्धन आणि किम यांच्यात मोठा वाद झाला आणि त्यानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लिअँडर पेसला एक मुलगी आहे. त्याला रिया पिल्लईपासून Aiyana Paes ही मुलगी आहे. रिया पिल्लई आणि लिअँडर २००० मध्ये लिव- इन- रिलेशनशिपमध्ये होते. २०१४ मध्ये रियाने लिअँडर आणि त्याच्या वडिलांविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yYUzpM