Full Width(True/False)

आश्चर्यच! चीनने चक्क अंतराळातून आणलेल्या बियाणांद्वारे केले पिकांचे उत्पादन

नवी दिल्ली : आपल्या हटके कारनाम्यांसाठी चीनला जगभरात ओळखले जाते. चीनने आता अंतराळातून आणलेल्या बियणांद्वारे धान्य उगवण्याची कामगिरी केली आहे. चीनने या धान्याला नाव दिले आहे. याचे पहिले पीक (बियाण्याच्या स्वरूपात) देखील काढण्यात आले आहे. चीनने स्पेस राइसच्या बियाणांना चंद्रयानासोबत नोव्हेंबरमध्ये अंतराळात पाठवले होते. यानाद्वारे ४० ग्रॅम वजनचा जवळपास १५०० धान्यांची बियाणे पृथ्वीवर आणण्यात आले. सर्व बियाणांना दक्षिण कृषी विद्यापीठाच्या परिसरात पेरले आहे. वाचाः ब्रह्मांड विकिरण आणि शून्य गुरुत्वाकर्षणाच्या संपर्कात आल्यानंतर या बियाणांना पृथ्वीवर आणण्यात आले आहे. स्पेस राइसचे पीक ग्वांगडोंगच्या दक्षिण चीन कृषि यूनिव्हर्सिटीच्या प्रजनन संशोधन केंद्रात कापण्यात आले. स्पेस राइसच्या बियाणांची लांबी जवळपास १ सेंटीमीटर आहे. स्पेस राइस म्हणजे काय ? अंतराळातील वातावरणात काही काळ राहिल्यानंतर या बियाणांमध्ये मोठे बदल होतात. अंतराळातून आणून पृथ्वीवर पेरल्यानंतर अधिक उत्पादन होते. केवळ धान्यच नाही तर अन्य पिकांबाबत देखील असे प्रयोग होतात. चीन १९८७ पासून तांदूळ आणि अन्य पिकांची बियाणे अंतराळात नेत आहे. वाचाः रिपोर्टनुसार, चीनने आतापर्यंत २०० पेक्षा अधिक पिकांबरोबर असा प्रयोग केला आहे. यात कापसापासून ते टॉमेटोचा समावेश आहे. २०१८ मघ्ये चीनने २.४ मिलियन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राच्या शेतीत अंतराळातून आणलेल्या बियाणांचा वापर केला. चीनी सोशल मीडिया यूजर्स याला स्वर्गातील तांदूळ असेही म्हणतात. ३-४ वर्षांनंतर अशा बियाणांना बाजारात उपलब्ध केले जाते. चीनची योजना चीनला चंद्रावर संशोधन केंद्र तयार करायचे आहे. या व्यतिरिक्त चीन अंतराळात पीक उत्पादनासाठी ग्रीनहाउसचा वापर करण्याचा देखील विचार करत आहे. चीनने १३ संशोधन संस्थान चंद्रावरील माती दिली आहे. याचा उद्देश चंद्रावरील भूगोलशास्त्र आणि विकासाबाबत अधिक जाणून घेणे हा आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36zW01T