Full Width(True/False)

आजीचं पार्थीव पाहून अनन्याला रडू आवरलं नाही;पाणावलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप

मुंबई : अभिनेत्री हिची आजी आणि चंकी पांडेच्या आईचे शनिवारी निधन झाले. अनन्या आणि तिच्या आजीचे नाते खूप खास होते. त्यामुळे आजीच्या निधनाचा अनन्याला मोठा धक्का बसला आहे. आपल्या लाडक्या आजीचे पार्थिव पाहून अनन्याला अश्रू रोखणे खूपच कठीण गेले. अनन्या पांडे कामाच्या निमित्ताने बाहेर होती. परंतु आजीच्या निधनाची बातमी समजल्यावर ती तातडीने मुंबईत दाखल झाली. घरी आल्यानंतर आजीचे पार्थिव शरीर पाहून अनन्याला दुःख आवरता आले नाही. आजीचे आणि अनन्या यांच्या खूपच छान बाँडिंग होते. त्यामुळे आजीच्या जाण्याचा धक्का तिला बसलेला दिसत होता. दरम्यान, नेमके कशामुळे झाले हे अद्याप समजलेले नाही. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतीम दर्शन घेत चंकी पांडे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे सांत्वन केले. अनन्या पांडे आजीची लाडकी चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ही आजीची खूपच लाडकी होती. अनन्याने आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्यासोबत डान्स करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अनन्याने तिच्या आजीसोबत 'स्टुटंडस ऑफ द इयर २' या सिनेमातील 'जवानी' गाण्यावर डान्स केला होता. अनन्याप्रमाणेच तिचे वडील चंकी पांडेचेही आईबरोबर खास नाते होते. नुकत्याच झालेल्या मदर्स डेच्या निमित्ताने चंकी पांडे यांनी आपल्या आईसोबतचा जुना फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत लिहिले होते, 'कायम आईचा लाडका मुलगा... १९८८ मध्ये आलेल्या गुन्हाओं का फासला या सिनेमाच्या सेटवरचा आईसोबतचा हा फोटो.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ATWHBk