Full Width(True/False)

आर्थिक अडचणींशी लढतेय शगुफ्ता अली, घरातल्या वस्तूही विकल्या

मुंबई : 'ससुराल सिमर का', 'पुनर्विवाह, 'एक वीर की अरसदास वीरा' आणि 'मधुबाला' यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांबरोबरच सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री यांना सध्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या ३६ वर्षांपासून शगुफ्ता मनोरंजन सृष्टीमध्ये काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत १५ सिनेमा आणि २० टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. परंतु आता त्यांना आर्थिक अडणींना सामोरे जावे लागत आहे. शगुफ्ता यांना झाला होता स्तनाचा कर्करोग शगुफ्ता अली यांनी एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ' गेल्या २० वर्षांपासून मी आजारी आहे. ज्यावेळी मला आजार झाला तेव्हा मी तरुण होते त्यामुळे सर्व परिस्थिती निभावून नेली होती. मला त्यावेळी तिसऱ्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. कॅन्सरवर मी कशीबशी मात केली. माझ्या आजाराबद्दल पहिल्यांदा बोलत आहे. माझ्या जवळच्या मित्रमंडळींना फक्त याची माहिती होती. बाकी इंडस्ट्रीमधील कुणालाही याची माहिती नाही.' ऑपरेशन आणि केमोथेरपीने तब्येत झाली खराब शगुफ्ता अली पुढे म्हणाल्या,' ज्यावेळी माझ्याकडे खूप काम होते. तेव्हाच मला कॅन्सरचे निदान झाले होते. माझा कॅन्सर तिसऱ्या टप्प्यात होता. त्यासाठी माझे ऑपरेशन झाले. त्यानंतर कितीतरी केमोथेरेपी झाल्या. प्रत्येक केमोथेरेपीच्या वेळी माझा नवीन जन्म व्हायचा,असे मला वाटायचे. उपचार सुरू असताना काम आणि जबाबदाऱ्या पूर्ण पाडल्या होत्या. म्हणूनच सर्जरी झाल्यानंतर १७ व्या दिवशी छातीला कुशन लावून मी चित्रीकरणासाठी दुबईला गेले होते.' चित्रीकरणावेळी देखील झाले होते अपघात शगुफ्ता अली यांच्या दुर्देवाचे फेरे इथेच थांबले नाही. अभिनेत्रीने पुढे सांगितले की चित्रीकरणावेळी देखील त्यांचे अनेकवेळा अपघात झाले होते. पायाला देखील दुखापत झाली होती. वडिलांना भेटायला जात असताना अपघात झाला. त्यावेळी पायाचे हाड मोडले आणि स्टीलचा रॉड घालावा लागला. तशा परिस्थितीतही शगुफ्ता यांनी काम केले होते. परंतु गेल्या सहा वर्षांपासून शगुफ्ता यांच्या आयुष्यात मोठे वादळ आले. या वादळामुळे त्यांचे आयुष्य पणाला लागले आहे. सहा वर्षांपूर्वी झाला डायबेटिस शगुफ्ता अली यांनी पुढे सांगितले, 'सहा वर्षांपूर्वी मला डायबेटिस झाला आणि तेव्हापासून अनेक शारीरिक व्याधींना सामोरी जात आहे. एखाद्या वयस्कर व्यक्तीला जेवढे आजार होतात, तेवढे आजार मला झाले आहेत. डायबेटीसमुळे माझ्या पायांवर खूप वाईट परिणाम झाला आहे. पाय सुजतात, त्याची संवेदना जाते आणि प्रचंड वेदना होतात.' २०१८ पासून कामाच्या शोधात शगुफ्ता अली यांची शेवटची मालिका 'बेपनाह' होती. ही मालिका २०१८ मध्ये प्रसारित झाली होती. त्यानंतर शगुफ्ता यांच्याकडे काम नाही. शगुफ्ता यांच्याकडे काम नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. शगुफ्ता यांनी १७ व्या वर्षापासून अभिनय करायला सुरुवात केली होती. आता त्या ५४ वर्षांच्या आहेत. या गेल्या चार वर्षांमध्ये त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि वाईट काळ होता. शगुफ्ता यांनी सांगितले की, 'दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दागदागिने आणि गाडी देखील मी विकली. डॉक्टरांकडे रिक्षानेच जाते. मला तातडीने आर्थिक मदत हवी आहे आणि त्यासोबत काम देखील हवे आहे. त्यामुळे मी माझे उर्वरित आयुष्य जगू शकेन.' देणार मदतीचा हात शगुफ्ता अलीची आर्थिक स्थितीबद्दल सिंटाचे सहाय्यक सेक्रेटरी आणि अभिनेता अमित बहल यांना समजल्यावर आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले. अमित बहल यांनी पुढे सांगितले, 'शगुफ्ता यांना शक्य ती सर्व मदत केली जाणार आहे. त्यांना काय हवे काय नको हे नुपूर अलंकार बघणार आहेत. लवकरच शगुफ्ता यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहोत.' बहल यांनी पुढे सांगितले की, 'सर्वप्रथम शगुफ्ता यांची मनातील नकारात्मकता दूर करण्याची गरज आहे. त्यांच्याशी संवाद साधत शगुफ्ता यांना ज्या गोष्टींची नितांत गरज आहे त्या दिल्या जातील. आम्ही सर्व अभिनेते मिळून एक रक्कम गोळा करून आमच्याकडून त्यांना आर्थिक मदत देणार आहोत. आम्ही ट्रेड युनियनच्या नियमांचं पालन करतो. त्यामुळे शगुफ्ता यांना भेटून सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. कारण दोन वर्षांपूर्वी त्यांची भेट झाली होती तेव्हा त्यांना शारीरिक व्याधी होत्या. परंतु आर्थिक अडचण नव्हती.' शगुफ्ता यांची परिस्थिती लवकरच सुधारेल अशी अपेक्षाही बहल यांनी यावेळी व्यक्त केली.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Uv1J6A