Full Width(True/False)

आजही शिल्पा शेट्टीला ऐकावी लागतात सासू- सासऱ्यांची बोलणी

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री लवकरच 'हंगामा २' या चित्रपटातून पुन्हा एकादा बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. २००९ साली बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केल्यानंतर शिल्पा कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. पण लवकरच ती कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. दरम्यानच्या काळात शिल्पा शेट्टी डान्स रिअलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहे. शिल्पा शेट्टी ही इतरांसाठी मोठी सेलिब्रेटी किंवा स्टार असली तरीही तिच्या खऱ्या आयुष्यात मात्र तुमच्या आमच्यासारखेच प्रसंग घडतात. बॉलिवूड स्टार असलेल्या शिल्पाला अनेक तिच्या सासू- सासऱ्यांकडून ओरडा मिळतो. याचा खुलासा तिनं नुकतंच ''च्या मंचावर केला. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये स्पर्धक फ्लोरिनाने सुपर गुरू तुषार यांच्यासोबत चार्ली चॅपलिनचा एक डान्स अॅक्ट केला होता. ज्याबाबत एकीकडे गीता कपूरला या जोडीकडून त्याहून जास्त अपेक्षा होत्या तर दुसरीकडे शिल्पा शेट्टीनं मात्र या जोडीचं भरभरून कौतुक केलं. याचवेळी तिनं तिला सासू- सासऱ्यांकडून कसा आणि कोणत्या कामासाठी ओरडा मिळतो हे सांगितलं. शिल्पा शेट्टी म्हणाली, 'कधी- कधी आपण मुलांकडून जरा जास्तच अपेक्षा ठेवत असतो. आपण याकडे दुर्लक्ष करू शकत नाही की, अनेकदा ही मुलं फार कमी वेळात डान्स सेट करतात. कधी कधी मागोमाग शूट असल्यानं त्यांना दोन डान्स अॅक्ट एकाच वेळी तयार करावे लागतात. याच कारणानं मला माझे सासू सासरे नेहमी ओरडत असतात. त्यांना वाटतं की, मुलं एवढं छान सादरीकरण करतात आणि आपण त्यातील त्यांच्या चुका सांगतो. माझे सासू- सासरे मला ओरडतात आणि म्हणतात, मुलं एवढं छान डान्स करतात तर मग तू त्यांना असं का म्हटलं?' शिल्पा शेट्टीचे तिच्या सासू- सासऱ्यांसोबत खूप चांगले संबंध आहेत. शिल्पा नेहमी तिच्या सोशल मीडियावर सासूसोबतचे फोटो शेअर करते. ज्यात या दोघींमधील बॉन्डिंग दिसून येतं. एकदा तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती सासूसोबत गार्डनमध्ये बसून गॉसिप करताना दिसली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2UlNfWq