मुंबई- मुलं आई- वडिलांच्या डोळ्यासमोर कधी मोठी होतात हे कळतही नाही. त्यातही मुलगी एक दिवस आई- वडिलांना सोडून सासरी जाते तो दिवस कोणीही विसरू शकत नाही. मुलीचं लग्न हा प्रत्येक बापाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. त्यात तिची पाठवणी करतानाचा काळ म्हणजे अत्यंत कठीण. अभिनेता यांच्याही आयुष्यात तो क्षण आला आणि सोहळ्याला उपस्थित सगळेच गहिवरून गेले. सुनील यांच्या मुलीचा सानिका बर्वेचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. त्याचा एक व्हिडीओ सुनील यांनी चाहत्यांसोबत शेअर केला. तो पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यात अश्रू तराळले. सुनील इन्स्टाग्रामवर फारसे सक्रिय नसतात. परंतु, त्यांच्या आयुष्यातील खास क्षण ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सेटवरील गमतीजमती आणि काही फोटोदेखील ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यातही सुनील यांचे कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडिओ अधिक पसंत केले जातात. सुनील यांनी सानिकाच्या लग्नात एकत्र डान्स करतानाचे काही खास क्षण व्हिडिओ स्वरुपात शेअर केले. दोघंही 'राझी ' चित्रपटातील 'दिलबरो' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. उपस्थितांच्या चेहऱ्यावर दोघांना नाचताना पाहतानाचा आनंद होता तर डोळ्यात लेक सासरी जाणार याचं दुःखही होतं. यातही सुनील बर्वे यांचा चेहरा सगळं काही स्पष्ट सांगत होता. फुलवा खामकरने या गाण्याची कोरिओग्राफी केली होती. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात पुष्कर श्रोत्री, अतुल परचुरे, सोनिया परचुरे, सुमित राघवन, चिन्मयी राघवन यांचाही समावेश होता. उपस्थितांसमोर सादर होणारा तो परफॉर्मन्स पाहून पुष्करसह इतरांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. जणू काही क्षणभर तिथे उपस्थित सगळ्यांनीच स्वतःला सुनील यांच्या जागी ठेवलं होतं. सुनील यांच्या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. सुनील सध्या 'सहकुटुंब, सहपरिवार' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ACPt4k