नवी दिल्लीः रिलायन्स जिओ ने काही दिवसापूर्वी विना डेली लिमिट सोबत येणाऱ्या प्रीपेड प्लानची घोषणा केली होती. यानंतर काही अशीच घोषणा एअरटेल आणि वोडाफोन आयडियाकडून करण्यात आली आहे. या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या युजर्संना ३० दिवस आणि ६० दिवसांची वैधता ऑफर केली जाते. जाणून घ्या कोणत्या कंपनीचा प्लान बेस्ट आहे. वाचाः जिओने राउंड फिगर वैधता सोबत येणारा प्लान्सला सर्वात आधी लाँच केले होते. यात १५, ३०, ६०, ९० आणि ३६५ दिवसाची वेधतेचे प्लान्सला लाँच केले होते. यानंतर भारती एअरटेल आणि त्यानंतर वोडाफोन आयडिया ने या ट्रेंड मध्ये सहभाग घेऊन ३० दिवस आणि ६० दिवसांच्या वैधतेचे प्लान लाँच केले. भारती एअरटेलचा ३० दिवसांचा प्रीपेड प्लान बाकीच्या दोन्हीच्या अपेक्षेपेक्षा थोडा महाग आहे. भारती एअरटेलच्या ३० दिवसाच्या वैधतेच्या प्लानची किंमत २९९ रुपये आहे. यात एकूण ३० जीबी डेटा दिला जातो. यासोबत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि डेली १०० एसएमएस सुद्धा दिले जाते. वाचाः यासोबतच या प्लानमध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, फ्री हॅलो ट्यून सब्सक्रिप्शन, एअरटेल एक्सट्रि्म प्रीमियम, विंक म्यूझिकचे सब्सक्रिप्शन दिले जाते. जिओच्या ३० दिवसाच्या वैधता असलेल्या प्लानची किंमत २४७ रुपये आहे. तर वोडाफोन आयडियाच्या ३० दिवसाच्या वैधता प्लानची किंमत २६७ रुपये आहे. दोन्ही प्लानमध्ये एकूण २५ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, अनलिमिटेड कॉल आणि डेली १०० एसएमएस दिले जाते. वोडाफोन आयडियाच्या प्लान सोबत Vi Movies & TV Classic चे सब्सक्रिप्शन दिले जाते. जिओच्या या प्लान सोबत जिओ अॅप्सचे बेनिफिट्स युजर्संना मिळते. एअरटेलचा प्लान बाकीच्या दोन्ही टेलिकॉम ऑपरेटर्स पेक्षा थोडा महाग आहे. परंतु, यात ५ जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जातो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jQkDPT