मुंबई : बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणून यांना ओळखले जाते. रुळलेल्या वाटेवर न जाता परेश रावल यांनी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करत अभिनयाच्या क्षेत्रामध्ये स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण करत यश संपादन केले. खलनायक, कॉमेडी ते व्यक्तिचरित्रात्मक अशा भूमिका देखील त्यांनी सहजपणे साकारल्या. अभिनयाबरोबरच परेश रावल हे राजकारण आणि समाजकारणातही सक्रिय आहेत. अलीकडेच परेश रावल यांनी एका मुलाखतीमध्ये मुलाला बॉलिवूडमध्ये आणण्यासंदर्भात मत व्यक्त करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहेत. स्टारकिड्सप्रमाणे लाँच केले नाहीपरेश रावल आणि स्वरुप संपत यांचा मुलगा याने 'बमफाड' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तो परेश यांचा मुलगा असल्याचे सगळ्यांना समजले होते. आदित्यचा बॉलिवूडमधील प्रवेश हा इतर स्टारकिड्सप्रमाणे झाला नाही. जेव्हा परेश यांना याबाबत एका मुलाखतीमध्ये विचारले तेव्हा त्यांनी सांगितले, 'माझ्या मुलाला आदित्यला, एखाद्या स्टारकिड्सप्रमाणे मला लाँच करता आले नाही. कारण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. एखाद्या कलाकाराला त्याच्या मुलाला जर बॉलिवूडमध्ये आणायचे असेल तर त्यासाठी मोठ मोठ्या गोष्टींची गरज असते आणि मला माझ्या मुलाला अशा पद्धतीने लाँच करायचे नव्हते. त्याला स्वतःच्या कर्तबगारीतून काम मिळावे असे मला वाटत होते आणि तसेच झाले देखील. माझ्या मुलाला बमफाड सिनेमात केलेल्या कामातून दुसरे काम मिळाले आहे, याचा मला नक्कीच अभिमान आहे. तो आता हंसल मेहता यांच्यासोबत काम करत आहे. मी आदित्यची कधीच कुणाकडे शिफारस केली नाही आणि त्याला तशा शिफारशीची गरजही नाही.' अभिनयासोबतच लेखनाचे धडे गिरवलेत आदित्यला बॉलिवूडमध्ये येण्याआधी तुम्ही काही सल्ला दिला होता का असा प्रश्न परेश रावल यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, ' माझा मुलगा अभिनेता व्हायच्या आधी लेखक होता. तो न्यूयॉर्क युनिर्व्हसिटीमधून स्क्रिप्ट लेखन आणि नाट्यलेखन शिकला आहे. लंडनमधील इंटरनॅशनल स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समधून त्याने अभिनयाचे सहा ते आठ महिने प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे मी त्याला काही सांगण्याऐवजी केवळ शुभेच्छा दिल्या आणि तुझ्यात जे सर्वोत्तम आहे ते दे इतकेच सांगितले.' परेश पुढे म्हणाले, 'मला माहिती आहे की आदित्य अतिशय शिस्तबद्ध काम करणारा आहे. तसेच आपले ध्येय्य काय आहे त्याला नेमके माहिती असल्याने त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मला त्याला काही शिकवण्याची गरज नाही. खरे तर त्याच्या वयाच्या पिढीला काही सांगण्याची गरज नाही. ही मुले त्यांचा मार्ग स्वतःहून निवडतात आणि आपणही त्यांना तो निवडून द्यावा असे मला वाटते. जेव्हा त्यांना सल्ला हवा असेल तेव्हा ते विचारतात आणि तेव्हाच तो आपण द्यावा. त्यांना पाठिंबा द्यावा.' दिग्दर्शनाचे धडे ही गिरवलेत दरम्यान आदित्य रावलने दिग्दर्शक रंजन चंदेल यांच्या 'बमफाड' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा सिनेमा झी फाईव्हवर ५ एप्रिल २०२० मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात आदित्यसोबत शालिनी पांडे, जतिन सरना आणि विजय शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. आदित्य जेव्हा लेखन करत होता तेव्हा तो दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरसोबत काम करत होता. त्याने आशुतोषसोबत 'पानिपत' सिनेमाचेही लेखन केले होते. त्याशिवाय त्याने अनेक नाटके, शॉर्ट फिल्म लिहिल्या आहेत. अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याचे लघुपट दाखवण्यात आले आहेत. सिनेमांशिवाय आदित्यने दोन पुस्तके देखील लिहिली आहेत. त्याशिवाय ड्रामा इन एज्युकेशन: टॉकिंग आऊट ऑफ द टेक्टबुक ही डॉक्युमेंट्रीची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले होते. लेखन, अभिनयाव्यतिरीक्त आदित्य उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू ही आहे. त्याने राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. सध्या आदित्य रावल दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या थ्रिलर सिनेमात काम करणार आहे. या सिनेमातून शशी कपूर यांचा नातू जहान कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाची निर्मिती अनुभव सिन्हा करत आहे. तर परेश रावल यांच्या कामाबद्दल सांगायचे तर ते लवकरच 'तुफान' आणि 'हंगामा २' या सिनेमांत दिसणार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hNkkne