पुणे- प्रसिद्ध कला दिग्दर्शक यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून आत्महत्या केली. पिंपरी- चिंचवडमध्ये येथे ही घटना घडली. ताथवडे येथील राहत्या घरात त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओत त्यांनी काम करत असताना लेबर युनियनचा एक पदाधिकारी त्रास देत असल्याचं राम साप्ते यांनी सांगितलं. या व्हिडिओमध्ये राजू म्हणाले की, 'हा व्हिडीओ कोणत्याही नशेमध्ये बनवत नसून मी पूर्णपणे भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जातोय. मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाही. सर्व देणी पूर्ण झालेलं असतानाही राकेश मोर्या लेबर लोकांना भडकवत आहे. यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत.' 'माझं पुढचं काम राकेश मोर्या सुरु करु देत नाहीयेत. माझ्याकडे सध्या पाच प्रोजेक्ट आहेत. पण राकेश मौर्या लेबर लोकांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला काम सुरू करता येत नाही. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावाही लागला. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे.' तसेच मला न्याय मिळवून द्या अशी मागणीही राजू यांनी व्हिडिओमध्ये केली. वाकड पोलीस ठाण्यात राम सापते यांच्या आत्महत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Anf5lC