Full Width(True/False)

फक्त ६,६९९ रुपयात मिळत आहे ‘हा’ शानदार स्मार्टफोन, आज पहिला सेल

नवी दिल्ली : टेक्नोने काही दिवसांपूर्वीच Spark Go २०२१ स्मार्टफोनला भारतात लाँच केले होते. या फोनची किंमत ८ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. जर तुम्ही स्वस्त व चांगला फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चा आज पहिला सेल आहे. या फोनवर अनेक ऑफर्स मिळत आहे. या फोनची किंमत आणि ऑफर्सविषयी जाणून घेऊया. वाचाः या फोनची किंमत ७,२९९ रुपये आहे. ही किंमत २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोनला गॅलेक्सी ब्लू, हॉरिझॉन ऑरेंज आणि मालदीव ब्लू रंगात खरेदी करू शकता. आज दुपारी १२ वाजल्यापासून ई-कॉमर्स वेबसाइट वर सेल सुरू होईल. फोनला इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत ६,६९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः Tecno Spark Go 2021 चे फीचर्स: हा फोन ड्यूल-सिम सपोर्टसह येतो व अँड्राइड १० गो एडिशनवर काम करतो. यात ६.५२ इंच एचडी+ डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला असून, याचे पिक्सल रिझॉल्यूशन ७२०x१६०० आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. फोन क्वाड-कोर मीडियाटेक हीलियो ए२० प्रोसेसरसह येतो व यात २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळेल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये ड्यूल-रियर कॅमेरा देण्यात आला असून, याचे प्रायमरी सेंसर १३ मेगापिक्सल आहे, जे एफ/१.८ अपर्चरसोबत येतो. दुसऱ्या कॅमेऱ्याची माहिती देण्यात आलेली नाही. सेल्फीसाठी अपर्चर एफ/२.० सोबत ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी यामध्ये ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी ४जी एलटीई, ब्लूटूथ व्ही ४.२ सारखे फीचर्स मिळतील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xzu0XW