नवी दिल्लीः टेक्नोलॉजीने आज सर्व लाइफ खूपच सोपी करून ठेवली आहे. परंतु, अनेक लोकांना याचे काही दुष्परिणाम सुद्धा माहिती नाहीत. आपण ज्या काही गोष्टी वापरत असतो. त्याचे काही चांगले बेनिफिट् तर आहेत परंतु, काही समस्या निर्माण करणारे सुद्धा आहेत. आपण नेहमी पाहतो की, नोकरी करणारे आपला वेळ वाचवण्यासाठी आपल्या छोट्या मुलांना फोन किंवा हेडफोन वापरण्याची परवानगी देतात. परंतु, ते या गोष्टीपासून अनभिज्ञ असतात की, त्यांच्या मुलांना यामुळे किती नुकसान होऊ शकते. तर मग, चला आज आपण याविषयी जाणून घेवूयात. यामुळे छोट्या मुलांच्या शरीराला किती नुकसान होते. वाचाः मुलांमध्ये कानाची समस्या उद्धभवत आहे करोना काळात मुलांच्या शिक्षणाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन क्लासला परवानगी देण्यात आली आहे. परंतु, या क्लासेस मध्ये मुलांना तास न् तास ईयरफोन किंवा हेडफोन वापरावा लागतो. यामुळे छोट्या मुलांच्या कानाच्या समस्या निर्माण होत आहेत. रिपोर्टच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात मुलांच्या कानात दुखणे, चिंताग्रस्त आणि संक्रमित होण्याच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार, हेडफोन आणि ईयरफोनचा जास्त वापर होत असल्याने कानावर जास्त जोर पडत आहे. तास् न तास वेगाने आवाज ऐकण्याची क्षमता कमजोर होत आहे. वाचाः हेडफोन किंवा ईयरबडने होऊ शकतो हा धोका डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, छोट्या वयात मुलांचे कान खूप नाजूक असतात. ईयर व्हॅक्स मुळे त्यांच्या कानात किटाणू प्राकृति रुपाने मरतात. हे व्हॅक्स त्यांच्या कानात संक्रमणने वाचू शकतात. परंतु, आता मुले हमखास हेडफोन किंवा ईयरफोनचा वापर करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कानात खाज येते. त्यानंतर ते त्या जागी ईयरफोन किंवा हेडफोनचा वापर करतात. त्यानंतर त्यांच्या कानातील व्हॅक्स हटवला जातो. कानाच्या आंतरिक भागात किटाणूच्या संक्रमणाचा धोका आणखी जास्त वाढतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hwaeXN