नवी दिल्ली. Samsung ने भारतात नुकताच नवीन गॅलेक्सी एफ सीरिज मोबाईल लाँच केला असून हा एक बजेट श्रेणीतील उत्तम फोन आहे. या स्मार्टफोनच्या पहिल्या सेलच्या प्रतीक्षेत असलेल्या युजर्सकरिता एक चांगली बातमी समोर आली आहे. उद्यापासून या स्मार्टफोनचा पहिला सेल सुरु होणार असून ग्राहकांना फ्लिपकार्टसह अन्य ऑनलाईन किंवा ऑफलाइन स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला हा फोन खरेदी करता येणार आहे. वाचा: Samsung Galaxy F22 किंमत आणि ऑफर Samsung Galaxy F22 ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,४९९ रुपये आणि ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,४९९ रुपये आहे. महत्वाचे म्हणजे ,यावर १००० रुपयांची बँक ऑफर देखील मिळेल, ज्यामुळे दोन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे ११,४९९ आणि १३, ४९९ रुपये होईल. सॅमसंगने हा स्मार्टफोन डेनिम ब्लॅक आणि डेनिम ब्लू कलर पर्यायामध्ये लाँच केला आहे. हा फोन तुम्ही १९ जुलै पर्यंतच्या मर्यादित ऑफरमध्ये कमी किंमतीत खरेदी करू शकता. Samsung Galaxy F22 वैशिष्ट्ये Samsung Galaxy F22 च्या वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर, यात ६.४ इंचाचा एचडी + सुपर एमोलेड डिस्प्लेआहे, ज्याचा रफ्रेश दर ९० हर्ट्ज आणि १६००X ७२० पिक्सलचा स्क्रीन रिझोल्यूशन आहे. Android ११ OS च्या OneUI ३.१ च्या आधारे, हा फोन मीडियाटेक हेलिओ जी ८० एसओसी प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. या फोनमध्ये ६,००० एमएएच बॅटरी आहे. जी १५ डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचे प्राथमिक सेन्सर ४८ मेगापिक्सल आहे. या फोनमध्ये ८ एमपी वाइड अँगल लेन्स, २ एमपी खोलीचे सेन्सर आणि २ एमपी मॅक्रो लेन्स देखील आहेत. या फोनमध्ये इतर बरीच खास वैशिष्ट्ये आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xBTHHo