नवी दिल्लीः मोटोरोला ने मार्केट मध्ये आपला जबरदस्त 5G स्मार्टफोन ला लाँच केले आहे. हा फोन ५जी अल्ट्रा वाइड बँड कनेक्टिविटी सोबत येतो. या फोनच्या युजर्संना फास्ट इंटरनेट स्पीडचा जबरदस्त एक्सपीरियन्स मिळेल. कंपनीने या फोनला ४जीबी रॅम प्लस ६४ जीबीच्या सिंगल स्टोरेज मध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत २९९.९९ डॉलर म्हणजेच जवळपास २२ हजार ४०० रुपये किंमत आहे. कंपनीने या फोनला सध्या फक्त अमेरिकेत लाँच केले आहे. वाचाः फोनची फीचर्स फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस मॅक्स व्हिजन डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 750G चिपसेट दिले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये कंपनीने एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर दिला आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंट मध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. १ टीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट मिळतो. या फोनमध्ये पॉवरसाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. २० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत मिळते. वाचाः कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, वाय फाय 802.11 ac, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, यूएसबी टाइप-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे ऑप्शन दिले आहेत. रियर फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये कंपनी वेराइजन अडेप्टिव साउंड सिस्टम ऑफर करते. जबरदस्त सराउंड साउंड एक्सपीरियन्स करतो. हे फीचर सर्व पॉप्यूलर ओटीटी अॅप्स सोबत काम करते. यात म्यूझिक आणि व्हिडिओ सारख्या साउंड प्रोफाइल मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eiTpOn