नवी दिल्ली : बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी खास प्लान लाँच केला आहे. कंपनीने ग्राहकांसाठी ६० दिवसांच्या वैधतेसह १०० जीबी डेटा ऑफर करणारा STV (स्पेशल टॅरिफ वाउचर) लाँच केले आहे. या वाउचरची किंमत ४४७ रुपये आहे. या व्यतिरिक्त २४७ रुपयांचा एसटीव्ही आणि १,९९९ रुपयांचा वाउचर देखील रिवाइज केला आहे. रिवाइज केलेल्या दोन्ही प्लानमध्ये कंपनीने डेली डेटा लिमिटला हटवले आहे. यात आता यूजर्सला ५०० जीबीपर्यंत डेटा ऑफर मिळत आहे. वाचाः फ बीएसएनएलचा ४४७ रुपयांचा प्लान ६० दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी १०० जीबी हाय-स्पीड डेटा ऑफर करत आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० फ्री एसएमएस, ट्यून्स आणि चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. २४७ रुपयांचा एसटीव्ही प्लान कंपनीने आपल्या २४७ रुपयांच्या एसटीव्हीमधून डेली डेटा लिमिटला हटवले आहे. या प्लानमध्ये ३० दिवस वैधतेसह दररोज ३ जीबी डेटा दिला जात होता. आता यूजर्सला ५० जीबी डेटा मिळेल. हा डेटा तुम्ही एकाच वेळी वापरू शकता. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएससोबत बीएसएनएल ट्यून्स आणि EROS Now चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. वाचाः १,९९९ रुपयांचा प्लान ३६५ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जात असे. मात्र, आता या प्लानमध्ये तुम्हाला ५०० जीबी डेटा मिळेल. यासोबतच, यूजर्सला १०० जीबी अतिरिक्त डेटा देखील मिळेल, हा डेटा प्लान लाइव्ह झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत रिचार्जनंतर मिळेल. प्लान अंतर्गत अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि EROS Now चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2V6ipkR