Full Width(True/False)

Dilip Kumar- भावांशी होता ३६ चा आकडा, मागे ठेवून गेले ६०० कोटींची संपत्ती

मुंबई- हिंदी सिनेमाचा महान अभिनेता 'ट्रॅजेडी किंग' म्हणून ओळखले जाणारे यांचं आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. हिंदूजा इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. त्यांच्या पालकांनी त्याचे नाव युसुफ खान हे त्यांचे मुळ नाव होते पण ज्येष्ठ अभिनेत्री देविका राणी यांनी सिनेमांसाठी त्यांचं नाव बदलून दिलीप कुमार असे ठेवले. १२ बहिणींपैकी एक, दिलीप यांचे बालपण फार गरिबीत गेलं होतं. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तानहून भारतात आले आणि मुंबईत स्थायिक झाले. दिलीप कुमार त्या काळात पुण्यातील आर्मी क्लबमध्ये सँडविच स्टॉलवर काम करत होते. दिलीप साहेबांचा पहिला पगार फक्त ३६ रुपये होता. असं असलं तरी त्यांच्या भविष्यात मात्र काही वेगळेच लिहिलेले होते. १९४४ मध्ये 'ज्वार भाटा' या सिनेमातून दिलीप कुमार यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर त्यांनी अंदाज, बाबुल, दीदार, आन, डाग, देवदास, आझाद, नया दौर, तराना, मधुमती, कोहिनूर, मोगल-ए-आजम, गंगा जमुना, राम और श्याम, क्रांती, शक्ती, मशाल आणि सौदागर अशा हिट सिनेमांमध्ये काम केलं. दिलीप कुमार आपल्या कामाबद्दल फारच गंभीर असायचे. त्यांच्या याच शिस्तीमुळे वयाच्या २५ व्या वर्षी ते देशातले नंबर एकचे अभिनेता झाले. अथक परिश्रम घेतले दिलीप कुमार जेवढे कष्टाळू होते तेवढाच त्यांचा स्वभावही विनम्र होता. भेटणाऱ्या प्रत्येकाशी ते आपुलकीने बोलायचे आणि समोरच्याची विचारपूस करायची ही त्यांच्या स्वभावातील काही वैशिष्ट्य होती. दिलीप कुमार यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे साधारणपणे ६०४ कोटी ६३ लाखांपेक्षा जास्तीची संपत्ती आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा सरकारने दिलीप कुमार यांच्या वडिलोपार्जित घराची किंमत ८० लाख ५६ हजार रुपये निश्चित केली आहे. सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता दिलीप कुमार यांनी अभिनयाच्या जगापासून ते राजकारणीपर्यंतचा प्रवास केला. ते काही वर्ष खासदारही होते. दिलीप कुमार हे त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. १९५० च्या दशकात ते एका सिनेमासाठी १ लाख रुपये आकारत असत, जे त्या काळात खूपच जास्त होते. भावांसोबतचा बंगल्यासाठीचा वाद दिलीप कुमार यांची तब्येत जेव्हा खालावयाला सुरुवात झाली होती त्याचकाळात भावांसोबतचा बंगल्यासाठीचा वाद सुरू झाला होता. अस्लम खान आणि एहसान खान हे दिलीप कुमार यांचे दोन भाऊ. पाली हिल, वांद्रे येथील बंगला क्रमांक- १६ साठी हा वाद होता. हा बंगला १ हजार ६०० चौरस मीटरपर्यंत पसरलेला आहे. या मालमत्तेचे एकूण मूल्य २५० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. दिलीप कुमार यांच्या वतीने यांनी बर्‍याच वर्षांपूर्वी शपथपत्र दाखल केले होते. यात दिलीप कुमारांच्या दोन्ही भावांचा या संपत्तीत वाटा नाही असं स्पष्ट करण्यात आलं होतं. या मालमत्तेसाठी वर्ष २००७ मध्ये अॅग्रीमेन्ट करण्यात आलं होतं. यात दिलीप कुमार यांना भाऊ एहसान यांना १ हजार २०० चौरस फूट जागा द्यावी तर दुसरा भाऊ अस्लमला ८०० चौरस फूट जागा द्यायची होती. पण नंतर दिलीप कुमार यांना तो बंगला पाडून तिथे इमारत करायची होती. ज्यासाठी बंगला काही दिवस रिकामी करायचा होता. परंतु भावांनी बंगला रिकामी करण्यास नकार दिला. हा बंगला १९५३ मध्ये दिलीप कुमारांनी विकत घेतला होता. बरीच वर्ष हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. २०१७ मध्ये दिलीप कुमार यांनी तो बंगला पाडला आणि तेथे इमारत बांधकामाचं काम सुरू केलं. असं म्हटलं जातं की या इमारतीत एक संग्रहालय असेल, तसेच इमारतीचा अर्धा भाग दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या नावावर असेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wkA1X5