Full Width(True/False)

ECG फीचरसह Huawei Watch GT 2 Pro लाँच , Huawei Band 6 Pro ची देखील एन्ट्री , पाहा किंमत

नवी दिल्ली: ने आपली नवीन स्मार्टवॉच आणि फिटनेस बँड लाँच केले असून यात नवीन ECG सपोर्ट फीचर आहे, जे युजर्ससाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर, Huawei Band 6 Pro ला बॉडी टेम्परेचर मॉनिटर, SpO2 मॉनिटर आणि अनेक विशेष फिचर्ससह सादर करण्यात आले आहे. वाचा: Huawei Watch GT 2 Pro आणि Huawei Band 6 Pro : किंमत स्मार्टवॉच Huawei Watch GT 2 Pro ईसीजी चीनमध्ये सुमारे ३५,५०० रुपयांमध्ये लाँच केली आहे. तर, फिटनेस बँड Huawei Band 6 Pro सुमारे ५२०० रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. Huawei स्मार्टवॉच सिंगल ब्लॅक कलर ऑप्शन आणि Huawei Band 6 Pro मध्ये मॅजिक नाईट ब्लॅक आणि मीका ग्रे कलर उपलब्ध आहे. हुआवेईच्या या दोन्ही प्रीमियम डिव्हाइसेसची विक्री पुढील महिन्यात सुरू होईल. येत्या काळात, Huawei चे नवीन स्मार्टवॉच आणि फिटनेस बँड देखील भारतात लाँच केले जातील अशी अपेक्षा आहे. Huawei Watch GT 2 Pro ECG आणि Huawei Band 6 Pro : वैशिष्ट्ये Huawei Watch GT 2 Pro ECG च्या फिचर्सबद्दल बोलायचे तर, यात १. ३९ इंच AMOLED कलर डिस्प्ले आहे, जो गोल डायलमध्ये आहे. त्याच्या डिस्प्लेचे स्क्रीन रिझोल्यूशन ४५४x४५४ पिक्सेल आहे. ईसीजी सपोर्टसह, या स्मार्टवॉचमध्ये इतर अनेक विशेष वैशिष्ट्ये आहेत. ज्यात रक्त ऑक्सिजन मॉनिटर, हार्ट रेट सेन्सर, स्लीप स्ट्रेस मॉनिटर, काइलिन ए १ प्रोसेसर, ४ जीबी स्टोरेज, १०० हून अधिक स्पोर्ट्स मोड्ससह अनेक. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, बॅटरी एकाच चार्जवर १२ दिवस वापरता येईल.असा दावा कंपनीने केला आहे. Huawei Band 6 Pro च्या फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात १.४७ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो एकाच चार्जवर १४ दिवस वापरता येतो. या फिटनेस बँडमध्ये SPO2 मॉनिटर, स्लीप ट्रॅकिंग, स्ट्रेस मॉनिटर आणि बॉडी टेम्परेचर मॉनिटरसह ९६ स्पोर्ट मोड्स देण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ffnRcw