Full Width(True/False)

१२ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येताहेत या ३२ इंचाच्या HD LED TV

नवी दिल्लीः जुना टीव्ही खराब झाला किंवा कोणत्याही कारणामुळे व्यवस्थित चालत नसेल तर आज आम्ही तुम्हाला स्वस्त एलईडी टीव्ही संबंधी ही खास माहिती देत आहोत. या एचडी रेडी क्वॉलिटी सोबत येणाऱ्या टीव्ही असून खूपच स्लीम आहेत. याला तुम्ही डीटीएचने कनेक्ट करून आपल्या पसंतीचे कार्यक्रम पाहू शकतात. भारतात एलईडी टीव्हीचा बाजार वेगाने पसरतोय. खूप साऱ्या कंपन्यांनी नवीन नवीन टीव्ही बाजारात लाँच केल्या आहेत. तसेच अनेक टीव्ही कंपनी टीव्हीची लाँचिंग करीत आहे. वाचाः कोडक ३२ इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही कोडेक फ्लिपकार्टवर ३२ इंचाचा एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही देत आहे. जो अँड्रॉयड ओएसवर काम करतो. याचा रिझॉल्यूशन १३६६ X ७६८ पिक्सल आहे. सोबत याचा साउंड आउट २० वॉट आहे. ६० एचझेडचे रिफ्रेश रेट डिस्प्ले दिला आहे. याची किंमत ११ हजार ४९९ रुपये आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर काही ईएमआय ऑप्शनवर लिस्टेड आहे. टीसीएलची ३२ इंचाची टीव्ही टीसीएलच्या ३२ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही ११ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. हा टीव्ही ३२ इंचाचा आहे. याचा रिझॉल्यूशन १३६६ X ७६८ पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट ६० एचझेड आहे. याचा साउंड आउटपूट १६ वॉट आहे. याला फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. या टीव्हीला अनेक बँकवर क्रेडिट कार्ड युजर्संना ईएमआय खरेदीसाठी पर्याय देत आहे. वाचाः फ्लिपकार्टवर १२ हजार रुपयांच्या किंमतीत एलईडी एचडी टीव्ही रेडी मिळत आहे. ज्यात वेगवेगळे फीचर्स दिले आहेत. फ्लिपकार्टवर ३२ इंचाचा टीव्ही मिळत असून याची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. यात २० वॉटचा साउंड आउटपूट आणि ६० एचझेडचे रिफ्रेश रेटचा डिस्प्ले दिला आहे. आणखी एक ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही लिस्टेड असून याची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rdkwzf