Full Width(True/False)

वर्षभरापूर्वी लाँच झालेले ‘हे’ फीचर बंद करण्याचा ट्विटरचा निर्णय, जाणून घ्या यामागचे कारण

नवी दिल्ली : माइक्रो-ब्लॉगिंग साइट ने एक वर्षापूर्वी आपले फीचर लाँच केले होते. हे फीचर स्टोरीजपासून प्रभावित होते. मात्र, आता एक वर्षाच्या आतच ट्विटरने हे बंद करत असल्याचे सांगितले आहे. फ्लिट्सचे कोणतेच भविष्य नसल्याने हा निर्णय घेत असल्याचे कंपनीने सांगितले. फ्लिट्सला ३ ऑगस्ट २०२१ पासून बंद केले जाईल. या जागी कंपनी दुसरे फीचर आणणार आहे. फ्लिट्सकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र आता निरोप घेण्याचा वेळ आला असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. वाचाः कंपनीने म्हटले आहे की, फ्लिट्सवरून लोक अगदी सहजपण चर्चा करतील असे वाटले होते. मात्र, जे यूजर्स जास्त ट्विट्स करत होते तेच याचा वापर करत आहे. याद्वारे लोकांना शेअर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधत आहे. वाचाः ट्विटरने सांगितले की, अनेक यूजर्सला फ्लिट्समध्ये रस नव्हता. तसेच, यूजर्सची संख्या देखील वाढत नव्हती. याबाबत कंपनी ब्लॉग पोस्टमध्ये माहिती दिली आहे. फ्लिट्सनंतर काय आणणार याबाबत माहिती देताना ट्विटरने सांगितले की, फ्लिट्समध्ये यूजर्स जास्त करून मीडिया शेअर करत असे. यूजर्स त्वरित फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चर्चेत सहभागी होत. आम्ही लवकरच ट्विट कंपोजर आणि कॅमेऱ्यामध्ये अपडेटला टेस्ट करणार आहोत, जेणेकरून काही फीचर्स आणता येतील. यात फुल स्क्रीन कॅमेरा, टेक्स्ट फॉर्मेटिंग ऑप्शन आणि GIF स्टिकर्स असतील. तसेच, टाइमलाइन स्क्रीनचा महत्त्वाचा भाग आहे. यावर काही नवीन फीचर्स देखील मिळतील, असेही ट्विटरने सांगितले. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iiqfjA