नवी दिल्लीः लॉजिटेक ने आपले नवीन वायरलेस माउस आणि कीबोर्डचे कॉम्बो पॅक Logitech MK470 ला भारतात लाँच केले आहे. माउस आणि कीबोर्ड दोन्ही स्लीम आणि कॉम्पॅक्ट आहेत. Logitech MK470 ला दोन कलर व्हेरियंट मध्ये खरेदी करण्यासाठी पर्याय आहेत. Logitech MK470 ला तुम्ही छोट्या 2.4GHz च्या USB ड्राइवरने कनेक्ट करू शकता. माउस आणि कीबोर्ड दोन्ही मध्ये बॅटरीची गरज आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे तीन वर्षापर्यंत वॉरंटी मिळते. ज्यात माउससाठी १८ महिने आमि कीबोर्डसाठी ३६ महिन्याची वॉरंटीचा समावेश आहे. वाचाः Logitech MK470 कॉम्बो पॅकची किंमत ४ हजार ९९५ रुपये ठेवण्यात आली आहे. याला ग्रेफाइट आणि ऑफ व्हाइट कलर मध्ये खरेदी करू शकता. सध्या अॅमेझॉनवर Logitech MK470 ची विक्री ४ हजार ४९४ रुपये आहे. या कॉम्बो पॅकच्या कीबोर्ड सोबत नंबर पॅड मिळत आहे. कीबोर्ड सोबत १२ फंक्शन कीज मिळते. एरो कीज एक वेगळ्या लोकेशनवर दिली आहे. वाचाः कनेक्टिविटीसाठी 2.4GHz चे USB रिसीवर मिळते. कीबोर्ड मध्ये दोन AAA बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ही बॅटरी ३६ महिन्याची बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कीबोर्डचे एकूण वजन ५५८ ग्रॅमआहे. माउससोबत हाय प्रिजीशन ऑप्टिकल ट्रॅकिंग आणि 1,000dpi सेन्सर मिळते. वाचाः माउससाठी तीन बटन एक स्क्रॉलर मिळते. माउस सोबत AA बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने १८ महिन्याच्या बॅटरी बॅकअपचा दावा केला आहे. याचे वजन १०० ग्रॅम आहे. Logitech MK470 चा वापर विंडोज १०, ८, ७ आणि याआधीच्या ओएस मध्ये केलेला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SSLgbP