मुंबई : Live Updates हिंदी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते यांचे बुधवारी सकाळी ७.३० वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या पश्चात पत्नी आहेत. दिलीप कुमार यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी मनोरंजन सृष्टीमध्ये स्वतःचे असे अढळ स्थान निर्माण केले होते. देवदास, मुगल-ए- आझम यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलेले दिलीप कुमार अनेकांसाठी आदर्श होते. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ उतार होत होते. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. करावे लागत होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. परंतू काही दिवसांननी पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने इस्पितळात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु यावेळी त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार यांचे पार्थिव अॅम्ब्युलन्समधून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले आहे. आज संध्याकाळी ५ च्या सुमारास सांताक्रुझ येथील जुहू स्मशानभूमीत दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. घरून त्यांचं पार्थिव थेट स्मशानभूमीत नेण्यात येईल. दिलीप कुमार शाहरुख खानला आपला मुलगा मानायचे. दिलीप कुमार यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की की जर त्यांना मुलगा झाला असता तर तो शाहरुखसारखा झाला असता. अशा परिस्थितीत जेव्हा शाहरुखने दिलीप साहेबांच्या मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा तो श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला. यादरम्यान शाहरुख प्रसारमाध्यमांमध्ये कुणाशीही बोलला नाही. फक्त ओलसर डोळ्यांनी घराच्या आत गेला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच दिलीप कुमार यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी पोहोचले. त्यांच्याआधी अनुपम खेरही घरी पोहोचले. दिग्गज अभिनेता धर्मेंद्रही दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचले. धर्मेंद्र त्याच्या फार्महाऊसवरून थेट खारमधील दिलीप साहेबांच्या घरी पोहोचले. धर्मेंद्र आणि दिलीप कुमार हे फार जवळचे मित्र होते. धर्मेंद्र यांच्या आधी शबाना आझमीही दिलीप कुमारांच्या घरी पोहोचल्या. विद्या बालनही पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत दिलीप कुमार यांच्या घरी अंत्यदर्शनाला गेली दिलीप कुमारांच्या घरी पोहोचल्या शबाना आझमी दरम्यान, त्याचे जवळचे मित्र आणि प्रियजन दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचायला सुरुवात झाली आहे. बॉलिवूडमधून शबाना आझमी सर्वात प्रथम दिलीप कुमारांच्या घरी पोहोचल्या. दिलीप कुमार यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी आणले जाईल, तेथून त्यांना दुपारी जुहू येथील सांताक्रूझ स्मशानभूमीत नेण्यात येईल. महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, 'एक विद्यापीठ गेले. भारतीय सिनेमाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा तेव्हा सर्वप्रथम आणि शेवटी देखील दिलीप कुमार यांचेच नाव असेल. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला हे दुःख पचवण्याची ताकद मिळो ही देवाकडे प्रार्थना.' डॉ. जलील पारकर म्हणाले- त्यांनी १०० वर्ष जगावं अशी आमची इच्छा होती माध्यमांशी बोलताना दिलीप कुमारांवर उपचार करत असलेले डॉ. जलील पारकर म्हणाले, 'आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी १०० वर्ष पूर्ण करावीत अशी आमची इच्छा होती. वयाच्या ९८ व्या वर्षी प्रत्येक व्यक्तीला शारिरीत अनेक समस्या उद्भवतात. डॉ. निखिल गोखले सतत दिलीप कुमारांची काळजी घेत होते. सकाळी सायरा बानोही त्यांच्यासोबत इस्पितळात होत्या. डॉ. निखिल २० वर्षांहून अधिक काळ त्यांच्यावर उपचार करत होते. आम्ही न्यूरोलॉजिस्ट आणि शल्यचिकित्सक यांच्यासोबत एकत्र येऊन त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्यासारखा माणूस बॉलिवूडमध्ये क्वचितच जन्माला येईल. त्यांनी जगात भारताचं नाव उंचावलं. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.' दिलीप कुमार यांच्या घराबाहेर रडताना दिसत आहेत चाहते दिलीप कुमार यांना सात दिवसांपूर्वी हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांना पुन्हा एकदा श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर मंगळवारी आयसीयू वॉर्डात त्यांना हलविण्यात आले. १० दिवसांपूर्वीच ते इस्पितळातून घरी गेले होते. दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनी मंगळवारी दिलीप साहेबांची तब्येत सुधारत असल्याचे सांगितले होते पण त्यानंतर अचानक बुधवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने अनेकांना धक्का बसला. दिलीप कुमार यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने ६ जून रोजी इस्पितळात दाखल करण्यात आले होते तेव्हा त्यांच्या फुफ्फुसात बायलेटरल प्ल्यूरल इफ्यूजन असल्याचं निदान झालं होतं. यात, फुफ्फुसांच्या सभोवताल पाणी साचते ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. डॉक्टरांनी उपचारांनी फुफ्फुसांजवळ जमा झालेले पाणी काढले होते. त्यानंतर पाच दिवसांनी त्यांना इस्पितळातून घरी सोडण्यात आलं होतं. दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ मध्ये पेशावारमध्ये झाला होता. दिलीप कुमार यांच्या पाच दशकांच्या सिनेकरिअरमध्ये ६० हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते. १९९८ मध्ये 'किला' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dOw6LQ