नवी दिल्ली : मोटोरोला लवकरच Edge+ सोबत फ्लॅगशिप मार्केटमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपल्या मिड-रेंज हँडसेटची घोषणा केली आहे. यावर्षी कंपनीने चीनमध्ये Motorola Edge S स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनला जागतिक बाजारात Moto G100 नावाने सादर करण्यात आले आहेत. आता रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे की, कंपनी नवीन एड्ज सीरिजच्या स्मार्टफोन्सवर काम करत आहे. वाचा: गेल्या आठवड्यात टिप्स्टर इवान ब्लासने Edge 20 मॉडेल्सच्या स्पेसिफिकेशनबाबत खुलासा केला होता. आता टिप्स्टरने एक ट्विट करत सीरिजच्या फोन्सच्या नावांचा खुलासा केला आहे. याआधी समोर आलेल्या लीकमध्ये समोर आले होते की, नवीन Edge मॉडेल्सचे कोडनेम Berlin/Berlin NA, Kyoto आणि Pstar (Sierra) असू शकता. आता ब्लासने खुलासा केला आहे की, या फोन्सला बाजारात Edge 20, आणि नावाने उपलब्ध केले जाईल. हे फोन्स या महिन्याच्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. वाचा: एड्ज २० एक ग्लोबल व्हेरिएंट असेल व याचे कोडनेम Berlin असू शकते. दक्षिण अमेरिकेतील बाजारात येणाऱ्या एडिशनला बर्लिन NA मार्केट्ससाठी उपलब्ध केले जाईल. या दोन्ही फोन्समध्ये स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसर दिला जाईल. एड्ज २० ग्लोबल एडिशनमध्ये दक्षिण अमेरिका एडिशनच्या तुलनेड डिस्प्ले आणि बॅटरीला डाउनग्रेड करण्यात आले आहे. मात्र, यात दमदार कॅमेरा मिळेल. एड्ज २० लाइट एक मिड रेंज फोन आहे, जो डायमेंसिटी ७२० चिपसेटसोबत येईल. एड्ज २० सीरिजचा हा सर्वात स्वस्त फोन असेल. हा ग्लोबल एडिशन असेल व भारतात देखील लाँच केला जाईल. Edge 20 Pro हा आशिया, यूरोप, ऑस्ट्रेलिया, लॅटिन अमेरिका, चीन आणि भारतात लाँच झालेल्या Edge+ व्हेरिएंटचे अपग्रेडेड व्हेरिएंट असेल. हा एक फ्लॅगशिप डिव्हाइस असू शकतो. मात्र, यात पॉवरफूल स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर ऐवजी स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट मिळेल. तसेच, चीनमध्ये लाँच होणाऱ्या व्हेरिएंटची तुलने दुसऱ्या मार्केट्समध्ये कमी क्षमतेचा फ्रंट कॅमेरा मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3humO8L