नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्त्यांची करण्यात आल्याच्या मुद्यावरून २०१९ मध्ये Pegasus चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा पेगासस चर्चेत असून, रिपोर्टनुसार अनेक देशातील सरकार याचा वापर करत आहेत. भारतासह जगभरातील १५०० पेक्षा अधिक लोकांचे नंबर समोर आले असून, त्यांची या स्पायवेअरद्वारे हेरगिरी होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पेगासस नक्की काय आहे व हे नक्की कसे काम करते ? असा प्रश्न निर्माण होतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. वाचाः पेगासस एक स्पायवेअर सॉफ्टवेअर असून, याद्वारे लोकांची हेरगिरी केली जाते. हे स्पायवेअर इस्त्रायलची एक कंपनी ने तयार केले असून, ही कंपनी सायबर शस्त्र बनवण्यासाठी ओळखली जाते. एनएसओ ग्रुपने देकील कन्फर्म केले आहे की पेगासस सॉफ्टवेअर आहे. कंपनीने माहिती दिली आहे की, ते केवळ सरकारलाच या सॉफ्टवेअरची विक्री करते व याच्या चुकीच्या वापरासाठी जबाबदार नाही. या स्पायवेअरद्वारे फोन हॅक झाल्याची यूजर्सला माहिती देखील मिळत नाही. फोनवर मेलिशियस लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर पेगासस फोनमध्ये इंस्टॉल होते. वॉयस कॉलद्वारे देखील हे इंस्टॉल केले जाऊ शकते. एवढेच नाही तर हे एवढे आधुनिक सॉफ्टवेअर आहे की केवळ मिसकॉलद्वारे देखील फोनमध्ये इंस्टॉल होऊ शकते. वाचाः फोनमध्ये इंस्टॉल झाल्यानंतर हे कॉल लॉग हिस्ट्री डिलीट करते. जेणेकरून, यूजरला मिसकॉलची माहिती मिळणार नाही. हे पूर्णपणे फोनवर लक्ष ठेवते व व्हॉट्सअॅपच्या एन्क्रिप्टेड चॅटेसला देखील सहज वाचू शकते. याशिवाय कॉल, यूजर्सची एक्टिव्हिटी देखील ट्रॅक करू शकते. सिक्योरिटी रिसर्चरनुसार, पेगासस लोकेशन डेटा, फोनच्या व्हिडीओ कॅमेरा, मायक्रोफोनचा अॅक्सेस घेऊ शकतो. याद्वारे कोणाचेही बोलणे ऐकणे शक्य होते. ब्राउजर हिस्ट्री, कॉन्टॅक्ट डिटेल्स, मेल, स्क्रीनशॉट इत्यादीची देखील माहिती मिळते. जर एखाद्या सरकारला लोकांची हेरगिरी करायची असेल तर पेगाससचा वापर सहज केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर याचा संपर्क कमांड अथवा कंट्रोल सर्व्हरसोबत ६० दिवस न झाल्यास किंवा चुकीच्या डिव्हाइसवर इंस्टॉल झाल्यास हे आपोआप नष्ट होते. दरम्यान, पेगासस हे खूपच महागडे सॉफ्टवेअर असून, याची किंमत लाखो डॉलर आहे. एनएसओ ग्रुपनुसार, या सॉफ्टवेअरची विक्री केवळ सरकारांनाच केली जाते. आता, देशातील पत्रकार व इतरांच्या हेरगिरीच्या मुद्यावरून हे सॉफ्टवेअर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z8EI8r