Full Width(True/False)

Samsung Galaxy F22: 6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा फोनची आज भारतात लाँचिंग

नवी दिल्ली. दक्षिण कोरियाची कंपनी Samsung आज भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन लाँच करणार असून या फोनचे नाव आहे. Samsung Galaxy F22 बद्दल बर्‍याच दिवसांपासून बातम्या येत आहेत. युजर्स देखील या फोनची प्रतीक्षा बऱ्याच दिवसांपासून करत होते. अखेर हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर लिस्ट झाला असून Samsung Galaxy F22 फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाहा सॅमसंग गॅलेक्सी एफ २२ च्या काही जबरदस्त वैशिष्ट्यांबद्दल. वाचा: सॅमसंग गॅलेक्सी एफ 22 ची संभाव्य वैशिष्ट्ये: फ्लिपकार्ट वेबसाइटवरील लिस्टनुसार,Samsung Galaxy F22 मध्ये ६.४ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचा रीफ्रेश दर ९० हर्ट्ज आहे. यात एक इन्फिनिटी-ओ डिस्प्ले आहे ज्यामध्ये फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. हा फोन मीडियाटेक हेलिओ जी ८० प्रोसेसर आणि ४ जीबी रॅमसह सुसज्ज असेल. तसेच यात ६४ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे फोनचे स्टोरेज वाढवता येऊ शकते. हा फोन सिंगल व्हेरिएंटमध्ये देण्यात येणार आहे किंवा दोन ते तीन प्रकारांमध्ये तो देण्यात आलेला नाही. Samsung Galaxy F22 फोन Android 11 वर काम करेल. तसेच वनयूआय वर आधारित असेल. फोनमध्ये ६००० एमएएच बॅटरी आहे जी १५ डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक सेन्सर ४८ मेगापिक्सल्सचा आहे. Samsung Galaxy F22 ची अपेक्षित किंमत: हा फोन १५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये लाँच करण्यात येऊ शकतो. जर असे झाले तर हा फोन भारतीय बाजारात रिअलमी ८ ५ जी, रेडमी नोट १० प्रो आणि सॅमसंग गॅलेक्सी एम ३२ सह स्पर्धा करू शकते. वाचा: वाचा: वाचा: ऑनलाइन शॉपिंग करताना वापरा ‘या’ टिप्स, पैशांची होईल मोठी बचत


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hktFCW